<p><strong>जळगाव - Jalgaon</strong></p><p>राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांनी स्वतः ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे.</p>.<p>ना.पाटील हे काही दिवसापूर्वीच जिल्ह्यात येऊन गेले असून हजारो नागरिक, राष्ट्रवादी आणि संबंधित पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा त्यांच्याशी संपर्क आला आहे. हाय रिस्क गटात येणाऱ्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले आहे.</p>