यंदा प्रथमच होणार ‘डिजीटल’ पर्युषण पर्व
जळगाव

यंदा प्रथमच होणार ‘डिजीटल’ पर्युषण पर्व

दिगंबर जैन समाजातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा

Rajendra Patil

जळगाव - Jalgaon

दिगंबर जैन समाजाचा सर्वात मोठा धार्मिक सोहळा म्हणजे पर्युषण पर्व. दरवर्षी तो भाद्रपद पंचमी म्हणजे गणेश चतुर्थी च्या दुसऱ्या दिवशी सुरु होतो व अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपतो, काय आहे या पर्वाचे महत्व जाणून घ्या....

10 दिवस चालणाऱ्याया काळात संपूर्ण देशातील दिगंबर जैन समाजाचे व्यक्ती जास्तीत जास्त वेळ मंदिरात व्यतित करतात. धर्मध्यान करतात. दिवसभर साधु संताच्या सानिध्यात मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी सरकारच्या नियमानुसार कोणतेही आयोजन संपूर्ण देशात होत नाही. त्यामुळे दिगंबर जैन समाजात निराशा पसरली होती.

यावर उपाय म्हणुन श्री भारतवर्षीय दिगंबर जैन युवा महासभा महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश-तेलंगाणा शाखेद्वारे पूर्ण भारतभरातील दिगंबर जैन बांधवासाठी डिजीटल पर्युषण पर्वाची संकल्पना सुरु केली. याद्वारे ‘जैनम झूम’ चैनलच्या माध्यमातुन घरी बसल्या दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

सकाळी ध्यान, अभिषेक, नित्य नियम पूजा, साधू संतांचे प्रवचन, सामूहिक माळा जाप, तत्वार्थ सूत्रावर व्याख्यान, प्रतिक्रमण, आरती, दशधर्म प्रवचन, विविध सास्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे.

यामध्ये देशभरातील 14 साधू संत सम्मिलित होणार आहे. रोज रात्री होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात हजारों रुपयांचे बक्षिसही दिले जाणार आहे. धूपदशमीच्या दिवशी भारतातील 108 मंदिरात धूप चढविण्याचा कार्यक्रम ही ऑनलाईन करण्यात येत आहे.

अजय पापडीवाल यांनी सांगितले कि ज्यांना यामध्ये सहभागी व्हावयाचे आहे त्यांनी प्राथमिक रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. ‘झूम ॲप’च्या माध्यमातुन होत असल्याने आम्ही सिमित लोकांनाच यामध्ये घेवु शकतो म्हणुन सर्वांनी लवकरात लवकर रजिस्टर करुन घ्यावे.

आतापर्यंत 5000 लोकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. कोरोनाच्या काळात समाजातील व्यक्ति सुरक्षीत रहावी व धर्मध्यान करुन पुण्यही मिळविता यावे यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात येत आहे.

यासाठी आनंद काला, अजय पापडीवाल, राहुल साहुजी, विपुल साहुजी, धीरज कासलीवाल, राकेश जैन चपलमन, पूर्वी शाह, सुनिता पाटणी, सुजाता बडजाते, राशी लोहाडे, योगिता पांडे, दिपाली गांधी, मयुरी पाटणी आदि कार्यरत आहे.

दिवसभर झूमद्वारे होणार कार्यक्रम : देश-विदेशातील व्यक्ति सहभागी होणार आहेत. आतापर्यंत 5000 लोकांनी केले रजिस्ट्रेशन केले असून त्यांना घरी बसल्या कार्यक्रमाचा आनंद मिळणार आहे, व कोराना संक्रमणापासुनही बचाव होणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com