पोलीस पोहचण्यापूर्वीच चोरटे पसार

जिल्हा परिषद कर्मचारी महिलेचे घर फोडले, दागिण्यांसह रोकडसह ७० हजारांचा ऐवज लांबविला
पोलीस पोहचण्यापूर्वीच चोरटे पसार
Crime

जळगाव - Jalgaon

शहरातील रामानंदनगर (Ramanandnagar) परिसरात संकल्प श्रीनगर कॉलनीत (Sankalp Srinagar Colony) जिल्हा परिषद (ZP) कर्मचारी महिलेचे घर फोडून चोरट्यांनी दागिण्यांसह रोकड असा एकूण ७० हजार ३०० रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना समोर आली आहे. पहाटे चार वाजेेच्या सुमारास चोरटे घरात घुसले, आवाजामुळे शेजार्‍यांना कळाले. (police) पोलिसांपर्यंत माहितीही पोहचली मात्र पोलीस पोहचण्यापूर्वीच ७० हजारांचा ऐवज लांबवून चोरटे पसार झाले होते.

जळगाव शहरातील संकल्प श्री नगर कॉलनीत विद्या काशिनाथ पाटील वय ४९ या मुलगा तेजस याच्याासोबत वास्तव्यास आहेत. त्या जिल्हा परिषदेत नोकरीला आहेत. १८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता मुलगा तेजर याची तब्येत खराब झाल्याने विद्या पाटील त्यास रोटे हॉस्पिटल येथे घेवून गेल्या होत्या. डॉक्टरांनी त्यास दाखल करुन घेतले. त्यामुळे विद्या पाटील ह्या दवाखान्या थांबल्या. याचदरम्यान १९ ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास चोरटे कुलूप कोयंडा तोडून विद्या पाटील यांच्या घरात घुसले.

शेजारच्यांकडून माहिती मिळाल्यावर विद्या पाटील दवाखान्यातून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गेल्या. तेथुन कर्मचार्‍यांना सोबत घेवून घरी पोहचल्या. मात्र तोपर्यंत चोर पळून गेले होते. घरात पाहणी केली असता, चोरट्यांनी घरातून सोन्याच्या दोन अंगठ्या, सोन्याचे कानातले तीन जोड, सोन्याची चैन, चांदीचे तीन कॉईन या दागिण्यांसह १० हजार रुपयांची रोकड असा ७० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लांबवून नेल्याचे समोर आले. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास राजेश शिंदे हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com