योगेश्वर नगरातील बंद घर चोरट्यांनी फोडले

योगेश्वर नगरातील बंद घर चोरट्यांनी फोडले

जळगाव Jalgaon। प्रतिनिधी

शहरातील Yogeshwar Nagar परिसरात बंद घर फोडून चोरट्यांनी thieves दागिने व 75 हजार 500 रुपयांची रोकड असा 2 लाख 44 हजार 100 रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी सकाळी समोर आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात Shanipeth police station गुन्हा दाखल झाला आहे. चोरट्यांनी घरातील काजू बदामसह इतर खाद्यपदार्थांवर ताव मारत ही चोरी केल्याचे समोर आले आहे.

योगेश्वर नगर येथे काजल विकास भोळे (वय 35,) ह्या पती विकास चंद्रकांत भोळे व मुलांसह वास्तव्यास आहेत. काजल भोळे यांच्या पती विकास भोळे यांचा अपघात झालेला असल्यामुळे त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहे. तसेच प्रेमचंदनगरात राहणारे त्यांचे वडील देखील आजारी आहेत. त्यामुळे काजल भोळे ह्या वडीलांची सुश्रुशा करण्यासाठी दररोज वडीलांच्या प्रेमचंदनगरातील घरी मुक्कामी असतात. नेहमीप्रमाणे 17 रोजी त्या योगेश्वर नगरातील घर बंद करुन दोन्ही मुलांसह वडीलांकडे मुक्कामी गेल्या. यादरम्यान चोरट्यांनी मध्यरात्री त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. व घरातून 1 लाख 68 हजार 600 रुपयांचे दागिने व 75 हजार 500 रुपयांची रोकड असा 2 लाख 44 हजार 100 रुपयांचा ऐवज लंपास केला. दरम्यान, काजल भोळे यांचे पती रुग्णालयात दाखल तर दुसरीकडे वडिलही आजारी आहेत. त्यातच घरातून मोठ्या प्रमाणावर रोकड व दागिणे लंपास झाल्याने भोळे यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.

तब्बल एक ते दोन तास चोरटे घरात

18 ऑगस्ट रोजी काजल भोळे यांचा मुलगा धवल हा घरी आल्यावर चोरीचा प्रकार उघड झाला. घटनेची माहिती मिळाल्यावर शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक यशोदा कणसे, परीस जाधव, किरण वानखेडे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. श्वान पथक व ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले होेते. चोरट्यांनी घरातील काजू, बदामसह खाण्याच्या विविध वस्तू शोधून काढल्या. फ्रीजमध्येही पाहणी केली. मिळालेल्या सर्व काजू बदामसह विविध वस्तूंवर ताव मारला. तब्बल एक ते दोन तास चोरटे घरात होते. मात्र शेजारच्यांना थांगपत्ताही चोरट्यांनी लागू दिला नाही. याप्रकरणी काजल भोळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक यशोदा कणसे ह्या करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com