चोरटे रिकाम्या हाती न जाता जेवण करून गेले

स्वत: तयार केले जेवण, पारोळ्यातील आश्चर्यकारक घटना
चोरटे रिकाम्या हाती न जाता जेवण करून गेले

पारोळा - प्रतिनिधी Parola

येथील माजी खासदार ए.टी.नाना पाटील (Former MP AT Nana Patil) यांच्या संपर्क कार्यालयाचा मागील बाजूस असलेल्या श्रीकृष्ण कॉलनीतील रहिवासी व पारोळा विश्रामगृह येथील शिपाई अशोक सदाशिव सैंदाने यांचे घर दि.10 च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील सर्व साहित्य भांडे अस्ताव्यस्त करून नुकसान केले.

घरात सोने अथवा चांदी किंवा रोख रक्कम न मिळाल्याने चोरट्यांनी चक्क घरातील गॅस चालू करून त्यावर पोहे बनवून शेंगदाणे तळून लोणचाचा आस्वाद घेऊन जेवणावर ताव मारून गेले,

येथील विश्रामगृह येथे शिपाई असलेल्या अशोक सदाशिव सैंदाणे हे नुकतेच सेवानिवृत्त झाल्याने त्यांचे चिरंजीव पुणे येथे नोकरीला असून अशोक सैंदाणे व त्यांची पत्नी हे दोघ पुणे येथे मुलाकडे गेले असताना दि.१० च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी घरातील प्रथम दरवाजा द्वितीय दरवाजा व तृतीय दरवाजे तीन कुलूप तोडून घरातील गोदरेज कपाट, क्वांट, देवारा, दिवान, कोट्या, डबे, कपडे, धान्य, सर्व साहित्य अस्ताव्यस्त करून नुकसान केले.

चोरट्यांचा हाती रोख रक्कम किंवा दागिने न लागल्याने चोरट्यांनी चक्क घरातील गॅस सुरू करून त्यावर पोहे शेंगदाणे बनवून लोणच्याच्या स्वाद घेत जेवण करून गेल्याची आश्चर्यजनक घटना अकरा च्या सकाळी उघडकीस आली याबाबत अशोक सैंदाणे यांनी पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्याशी संपर्क करून याबाबत माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व लवकरच तपास लावू असे आश्वासन दिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com