गावराण शेळ्या वाटपाविषयी चौकशी होणार

जि.प,सभेत विषय गाजला, देशदूतच्या बातमीचा दणका
गावराण शेळ्या वाटपाविषयी चौकशी होणार

चाळीसगाव | प्रतिनिधी

तालुक्यातील चार जिल्ह्यासाठी एकमेव असलेल्या बिलाखेड येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी शेळी विकास प्रक्षेत्रात नुकतेच शासनाच्या आदेशाला खो देत, शेतकर्‍यांना चक्क उस्मानाबादी नव्हे, तर गावठी(गावरान) शेळ्यांचे वाटप करण्यात आल्याचा प्रकार घडला, या विषयाला वाचा फोडण्यासाठी दि,२५ जुलै रोजी देशदूत ‘ शेतकर्‍यांना उस्मानाबादी नव्हे, तर गावराण शेळ्यांचे वाटप ’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशीत केली होती, याच बातमीची दखल घेवून काल जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन झालेल्या सर्वसाधरण सभेत जि.प.सदस्य मधुकर काटे यांनी या संपूर्ण प्रकरणा बाबत प्रश्‍न उपस्थित करुन, चौकशीची मागणी केली. आता या संपूर्ण प्रकरणाची जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.अविनाश इंगळे यांनी चौकशी करुन अहवाल सादर करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान भारतातील २५ जातीपैकी एक असलेली उस्मानाबादी शेळी न देता, चक्क गावठी शेळी देवून शासनाच्या व शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा प्रकार येथे घडला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मेंढी शेळी विकास प्रक्षेत्रात अशेच प्रकार घडत असल्याची शेतकर्‍यांमध्ये चर्चा आहे.

काय आहे प्रकरण-

पाचोरा तालुक्यातील सांगवी, नगरदेवळा, आखतवाडे, वडगांवकडे आणि सार्वे अशा लाभार्थ्यांना (दि,२२) पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र या विभागामार्फत शासनाच्या विशेष आणि नाविण्यपूर्ण योजनेतून दहा शेळ्या आणि १ बोकड असे वाटप प्रत्येक लाभार्थ्यांसाठी पाचोरा पशूसंवर्धन अधिकारी महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शासनाच्या आदेशात जातीवंत शेळ्या असा वाटप करण्याचा प्रकार होता. त्या अनुषंगाने उस्मानीबादी शेळ्यांचे वाटप केले जाणार होते. मात्र एैनवेळी शेळी पुरवठादार पंकज मच्छीमार सह. संस्था. रंजाळे ता. अमळनेर यांनी गावढी शेळ्या लाभार्थ्यांसमोर आणून ठेवल्याने शेवटी नाईजास्तव मजबूरीने लाभार्थ्यांना इच्छा नसतांनाही या गावठी शेळ्या घ्याव्या लागल्यात. मात्र यातील सार्वे येथील एका लाभार्थ्याने उस्मानीबादी ही जातीवंत शेळी नसल्याने गावठी शेळी घेण्यास नकार दिल्याने त्या लाभार्थ्यांला नंतर दिल्या जातील असे सांगीतले गेले. उर्वरीत लाभार्थ्यांना पुरवठा करण्यात आलेल्या शेळ्या ह्या गावरान आणि काही प्रमाणात वयस्कर आणि भाकडअशा स्वरुपाच्याच होत्या. एकूणच पाचोरा येथील पशूसंवर्धन अधिकारी यांनी त्या पुरवठादाराकडून शासनाच्या नियमात बसत नसल्याने स्विकारण्यास नकार द्यावयास हवा होता. परंतू तसे झाले नाही. तसेच शेळीच्या कानाला शासनाचा बिल्ला मारण्यासाठी देखील पाचशे रुपयांची मागणी करण्यात आल्याची चर्चा काही शेतकर्‍यांमध्ये होती. उस्मानाबादी शेळ्या न घेता, गावठी शेळी देवून शासनाची व शेतकर्‍यांची एकप्रकारे फसवणू करणार्‍या संबंधीत आधिकार्‍यांची चौकशी होवून योग्य कारवाई करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर बामती देशदूत प्रकाशीत केली होती, त्यांची दखल घेवून भाकड शेळ्याचा विषय जि.प.च्या प्रथम झालेल्या ऑनलाईन सर्वसाधरण सभेत गाजला असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

माझा गावातील दोन प्रकरणे होते, शेतकर्‍यांनी उस्मानाबादी शेळ्या न देता भाकड (गावराण) शेळ्या दिल्या गेल्यात, यासंपूर्ण प्रकरणाबाबत मी कालच्या सभेत प्रश्‍न उपस्थित केला असून चौकशीची मागणी केली आहे. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.अविनाश इंगळे यांनी याबाबत चौकशीचे आश्‍वसन देवून, संपूर्ण प्रकरणाबाबत येत्या आठ ते दहा दिवसात अहवाल सादर करण्याचे आश्‍वसन दिले आहे.
मधुकर काटे, जि.प.सदस्य पिंपळगाव हरेश्‍वर गट,ता.पाचोरा
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com