चाळीसगाव : बंद घरातून साडेसात लाखांचा ऐवज लंपास

शहरात चोरीचे सत्र सुरुच, पोलिसांची चोरट्यांना पकडण्यासाठी दमछाक
चाळीसगाव : बंद घरातून साडेसात लाखांचा ऐवज लंपास

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

शहरातील खरजई रस्त्यावरील जवळपास साडेसतरा लाखाची रोकड असलेले (ATA Machine) एटीए मशीन चोरीची घटना ताजी असताना, आता पुन्हा शहरातील बाबाजी चौकातील बंद घरातून दागीणे आणि रोख रक्कम असा एकूण ७ लाख ३७ हजारांचा एैवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून चोरट्यांनी पोलिसांपुढे आवाहन उभे केले आहे. चोरट्यांनी पकडण्यासाठी पोलिसांची दमछाक होत आहे.

शहरातील परिवार कलेक्शन (Collection) या कापड दुकानाचे मालक कपील दुर्गाप्रसाद अग्रवाल (Kapil Durga Prasad Agarwal) हे बाबाजी चौकातील त्यांच्या घराला कुलूप लावून घराच्या सेफ्टी लॉकची चावी चप्पल बुट ठेवतात, त्या रॅकवर ठेवून कुटुंबासह अमरावती जिल्ह्यात नातेवाईकांच्या लग्नासाठी गेलेले होते, ते वरच्या मजल्यावर राहतात तर त्यांचे लहान भाऊ हे खालच्या मजल्यावर राहतात.

या दरम्यान काल रात्री दोन वाजेच्या सुमारांस अज्ञात चोरट्यांनी जिन्यावरुन प्रवेश करीत शुज टॅकवर ठेवलेली (Safety lock) सेफ्टी लॉकच्या चावीने दरवाजा उघडून बेडरुम मधील लाकडी वार्डरोब मधील लॉकरमध्ये ठेवलेले जवळपास अठरा ते वीस तोळे सोने आणि साडेचार लाख रुपयांची रोख रक्कम अलगद चोरुन नेली. कपील अग्रवाल आणि त्यांचे कुटूंब पहाटे साडेचार वाजता अमरावतीहून घरी परत आले असता, त्यांना घराचा दरवाजा उघडलेला आढळून आला. त्यांनी तात्काळ त्यांच्या कपाटातील एैवज आणि रोख रक्कम शोधली असता ती गायब झाली असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काल पोलीस स्टेशन गाठुन माहिती दिली.

या प्रकरणी कपील अग्रवाल (Kapil Agarwal) यांनी पोलीसांत तक्रार दिली असून या तक्रारीत त्यांनी सोन्याच्या दागीण्यांसह रोख रक्कम असा ७ लाख ३७ हजाराचा एैवज त्यात ४५ हजाराच्या दोन बांगड्या, ७५ हजाराचे सोन्याचे मनीमंगळसूत्र, ३५ हजाराचे तीन जोड कानातील टॉल्स, ६० हजाराचे फॅन्सी मंगळसूत्र, १५ हजाराची लहान मुलांच्या गळ्यातील चैन, ३५ हजाराच्या सोन्याच्या अंगठ्या, ७,५०० रुपयांची बिंदी, १५ हजाराची कानातील साखळी आणि ४ लाख ५० हजार रुपये रोख असा एैवज चोरीस गेल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com