चाळीसगाव येथे ४८ हजारांची चोरी

चाळीसगाव येथे ४८ हजारांची चोरी

चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

शहरातील महाराणा प्रताप हौसिंग सोसायटीत वास्तव्यास असलेल्या प्राध्यापीकेच्या दिराचे कोरोना आजाराने निधन झाले, त्या गावी गेलेल्या होत्या, हिच संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातून ४८ हजाराची रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, महाराणा प्रताप हौसिंग सोसायटीतील कविता हरेंद्र निकम या येथील राष्ट्रीय महाविद्यालयात प्राध्यापीका आहेत. त्यांच्या दिराचे कोरोना संसर्गाने निधन झाले म्हणून त्या त्यांच्या मुक्ताईनगर या गावी गेल्या होत्या.

या बंद घराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कडी-कोयंडा व कुलूप तोडून कपाटातील ४८ हजाराची रोख रक्कम चोरुन नेली. या प्रकरणी शहर पोलीसांत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com