चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

शहरालगत असलेल्या विराम लॉन्स येथे एका लग्न सोहळ्यात चक्क नवरीच्या आईच्या अंगावर खाज येण्याची पावडर सदृश्य वस्तू फेकून अज्ञात चोरट्यांनी तिच्या जवळील पर्ससह ३ लाख ४५ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चॉंदीचे दागिने लांबविल्याची घटना दि,८ रोजी घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजू निंबा कुमावत यांच्या मुलीचा विवाह दि,८ रोजी विराम लॉन्स येथे होता, त्यांची पत्नी संगीता राजू कुमावत यांच्या हतातील पर्समध्ये सोन्या-चॉंदीचा तब्बल ३ लाख ५४ हजार ५०० रुपये किमतीचे ऐवज ठेवलाल होता.

लग्नात अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवत, संधी साधून त्यांच्या अंगवार खाज येण्याची पावडर (वस्तू) फेकली, त्यांच्या अंगाला खाज येत असल्याने, त्यांनी हातातील पर्स व बॅग खाली ठेवली, हिच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी पर्स व बॅग दोन्ही घेवून पोबारा केला. नवरीच्या आईचे ऐवज लपास झाल्याने, अचनाक आनंद सोहळ्यात विघ्न आल्याने सर्वांनाच धक्का बसला. याप्रकरणी राजू निंबा कुमावत यांच्या खबरीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.