आव्हाणे येथे ग्रामपंचायतीच्या बोरींगची केबल लंपास

तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आव्हाणे येथे ग्रामपंचायतीच्या बोरींगची केबल लंपास

जळगाव - Jalgaon

तालुक्यातील आव्हाणे येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या बोरींगची ९ हजार रूपये किंमतीची केबल वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची १२ एप्रिल रोजी समोर आली होती. याप्रकरणी आज रविवारी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील अव्हाणा येथील ग्रामपंचायतीच्या मालकीची बालाजी नगरात बोरींग आहे. या बोरींगची ९ हजार रूपये किंमतीची केबल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे १२ एप्रिल रोजी सायंकाळी उघडकीला आले. यानंतर ग्रामपंचायत कर्मचार्‍यांसह इतरांनी परिसरात सर्वत्र केबलचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही.

यानंतर आव्हाणा येथील ग्रामपंचायत कर्मचारी रामकृष्ण पाटील यांनी याबाबत आज तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय दुसाने करीत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com