<p><strong>जळगाव - Jalgaon</strong></p><p>तालुक्यातील खेडी शिवारात शनिवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत तीन घरांमधून लाखोंचा ऐवज लुटून नेला.</p>.<p>एका घरात दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत वृध्द दाम्पत्य जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांसह एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे. एकाच रात्रीतील चार घटनांनी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.</p>