जळगावात चोरी ; दोन तरुणांना अटक
जळगाव

जळगावात चोरी ; दोन तरुणांना अटक

एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

Rajendra Patil

जळगाव | प्रतिनिधी Jalgaon

रामेश्‍वर कॉलनीतील मंगलपुरी परिसरामधील चोरीप्रकरणी पोलिसांनी दोन संशयीत तरुणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी २२ हजार रुपये किंमतीचा टीव्ही जप्त केला आहे.

याबाबत आकाश जगन साळुंखे (वय २७, गेंदालाल मिल परिसर, कानळदा रोड) यांनी फिर्याद दिली. त्यांची बहीण काजल साळुंखे या रामेश्‍वर कॉलनीतील मंगलपुरी परिसरात भाड्याच्या पार्टीशनच्या घरात राहतात. त्यांच्या घराच्या दरवाज्याचा कडीकोयंडा खराब झाला होता. त्यामुळे ती महिला दरवाजाला दोरी अडकवून लग्नाला गेली होती.

चोरट्यांनी १० जुलै रोजी सकाळी १० ते १८ जुलै रोजी ११ वाजेदरम्यान घरातील २२ हजार रुपये किमतीचा ३२ इंची एलजी स्मार्ट टीव्ही लांबवला. या घटनेबाबत महिलेच्या भावाने २२ जुलै रोजी फिर्याद दिली. त्यावरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित दगडू प्रल्हाद शिंदे (वय ३०) आणि गौरव रवींद्र खरे (वय २१, रा.मंगलपुरी, रामेश्‍वर कॉलनी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी दोघांना अटक केली.

Deshdoot
www.deshdoot.com