बाहुटे येथील तरुणाने विषारी औषध सेवन करून संपवली जीवन यात्रा

वडिलांना दिसला मुलगा जमिनीवर पडलेला
बाहुटे येथील तरुणाने विषारी औषध सेवन करून संपवली जीवन यात्रा

पारोळा प्रतिनिधी - Parola

तालुक्यातील बाहुटे येथील निलेश हिरालाल मोरे 30 यांनी दिनांक 21 रोजी रात्री काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता उघडकीस आली.

याबाबत बाहुटे येथील हिरालाल किसन बडगुजर यांच्या मुलगा निलेश हिरालाल मोरे (वय 30) हा पत्नी व मुलाबाळांसह सुरत येथे कामानिमित्त गेला होता तो सध्या बाहुटे येथे आलेला असताना दि.21 रोजी सायंकाळी मी बाहेर जाऊन येतो असे सांगून वडिलांचे मोटरसायकल घेऊन गेला असता तो रात्री उशिरापर्यंत परत आला नाही म्हणून वडील रात्री झोपून गेले त्यानंतर दिनांक 22 रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास वडील घराच्या मागे मोकळ्या जागेत गेले असता त्यांना त्यांचा मुलगा निलेश हा जमिनीवर पडलेला दिसला त्यांनी त्यास उठवले असता त्याच्या तोंडातून फेस येत होता व उग्र वास येत होता म्हणून त्यांनी गावातील विलास भिकन पाटील, संभाजी दिनकर पाटील यांच्या मदतीने त्यास खाजगी वाहनाने पारोळा कुटीर रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले असता तेथे डॉक्टर हेमंत चौधरी यांनी तपासून सकाळी साडेनऊ वाजता मयत घोषित केले.

याबाबत हिरालाल बडगुजर यांच्या खबरी वरून पारोळा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुनील वानखेडे हे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com