सांस्कृतिक महोत्सवातून संस्कृती रुजविण्याचे काम

स्व. पृथ्वीराज चव्हाण सांस्कृतिक महोत्सवाचा ‘कबीर’ या कार्यक्रमाने समारोप
सांस्कृतिक महोत्सवातून संस्कृती रुजविण्याचे काम

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

साहित्य, नाट्य, संगीताचे विविध कार्यक्रमांचे महोत्सव घेऊन परिवर्तन संस्था Parivartan Sanstha जळगावात महोत्सव संस्कृती रुजवत festival culture in Jalgaon असल्याचा सूर स्व. पृथ्वीराज चव्हाण सांस्कृतिक महोत्सवाच्या Late. Prithviraj Chavan Cultural Festival समारोप प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केला.

परिवर्तन व भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन आयोजित तीन दिवसीय स्व. पृथ्वीराज चव्हाण सांस्कृतिक महोत्सव समारोप रविवारी झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आ. शिरीष चौधरी, पद्मश्री डॉ. भालचंद्र नेमाडे, पद्मश्री कविवर्य ना. धों . महानोर, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन, आ. चिमणराव पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, भरत अमळकर, जे. के. चव्हाण, शिरिष बर्वे, अंजली पाटील उपस्थित होते. याप्रसंगी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आबा महाजन यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी मानपत्राचे वाचन रंगकर्मी मंगेश कुलकर्णी यांनी केले. आ. शिरिष चौधरी यांनी परिवर्तनच्या कार्याचा व उपक्रमांचा गौरव केला.

कबीरांच्या दोह्यांचे सादरीकरणाला उपस्तिथांची दाद

याप्रसंगी संत कबिराच्या दोह्यांवर आधारित सांगीतिक कार्यक्रमाचे सादरीकरण शंभू पाटील यांनी दोह्यांचं, तत्वज्ञानाचं निरुपन केले. यात मन लागो यारा फकिरी मे, केछो दिन मोने मोने, धुंघट के पट खोल, चदरीया झिनी झिनी यासारखे अनेक दोहे, भजन, उलटबासी सादर करण्यात आल्या. त्याला उपस्थितांकडून दाद देखील देण्यात आली.

या कार्यक्रमाचे दिग्दर्शन नारायण बाविस्कर यांचे होते तर संगीत संयोजन मंजुषा भिडे यांचे होते. कार्यक्रमात सुदिप्ता सरकार, श्रद्धा पुराणीक कुलकर्णी, निखिल क्षिरसागर, विशाल कुलकर्णी, रजनी पवार, प्रतिक्षा कल्पराज, हर्षदा कोल्हटकर, साक्षी पाटील, सुयोग गुरव , भुषण गुरव यांनी गीते सादर केली. वादक मनीष गुरव, बासरीवर योगेश पाटील यांनी साथसंगत केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com