महिलेने तरुणाच्या डोक्यात मारली काठी

समतानगरातील घटना, रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल
महिलेने तरुणाच्या डोक्यात मारली काठी

जळगाव - Jalgaon

शहरातील समतानगर येथे फोन लावण्याच्या कारणावरुन महिलेने वाद घालत तरुणाला त्याच्या घरासमोरच डोक्यात लाकडी दांडक्याने मारहा करत दुखापत केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी माहराण करणार्‍या महिलेविरोधात रामानंदनगर पोलिसात (Ramanandnagar Police) गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील समतानगरातील भैय्या गल्ली येथे मुकेश रविंद्र माळी वय ३२ हार तरुण वास्तव्यास आहे. तो हमाली काम करुन उदरनिर्वाह भागवितो. मंगळवारी सायंकाळी मुकेश माळी हा घरासमोर उभा असतांना फोन लावण्याच्या कारणावरुन गल्लीतील महिला ललीता दिपक शिरसाळे हिने मुकेश सोबत वाद घातला. तसेच लाकडी दांडा मुकेशच्या डोक्यावर मारुन दुखापत केली. यात मुकेश हा जखमी झाला. याप्रकरणी मुकेश माळी याने दिलेल्या तक्रारीवरुन ललीता शिरसाळे रा. भैय्या गल्ली, समतानगर हिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अजित पाटील करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com