Video यावल कृऊबा आवारातील गोदाम कोसळले

जिवीत हानी टळली
Video यावल कृऊबा आवारातील गोदाम कोसळले

यावल - प्रतिनिधी Yaval

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील धान्य दुकानदाराला 29 वर्षाच्या करारावर दिलेल्या भाडेपट्टा वरील गोदामाची भिंत अचानक कोसळून या ठिकाणी चार लाखाचे वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नुकसान झाले सुदैवाने

या ठिकाणी जीवित हानी झाली नाही 21 ऑक्टोबर 20 बुधवार रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीची ची आवारातील शेख अख्तर शेख चांद भुसार व्यापारी यांना 29 वर्षाच्या करारावर दिलेल्या गोदामाची अचानक भिंत कोसळली त्यात ज्वारीचे ठेवलेल्या होत्या सकाळी आठ वाजेला ही घटना घडली.

जर ही थोडी उशीरा घडली असती तर येथे मोठा अनर्थ घडला असता या भिंतीला तडा गेलेला होता कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे आजूबाजूच्या लोकांना सूचना देण्यात आली होती व चुकीचे काम लवकरच करण्यात येणार होते मात्र ही आज रोजी सकाळी आठ वाजेला घटना घडली त्यात कृषी बाजार समितीचे चार लाखाचे नुकसान झाल्याची सचिव स्वप्नील सोनवणे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com