फरशी पूल वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला

धुळपिंप्री-मालखेडे दरम्यान होता पुल
फरशी पूल वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला

पारोळा - parola

तालुक्यातील धुळपिंप्री गावाजवळील फरशी पूल काल रात्री झालेल्या पावसात वाहून गेल्याने वाहतूक ठप्प होऊन गावांचा संपर्क तुटला आहे.

पारोळा कासोदा रस्त्यावरील मालखेडा धुळपिप्रि गावादरम्यान अंजनी नदीवरील फरशी पूल काल रात्री धोत्रे, मंगरूळ, धुळपिप्रि, मालखेडे, उमरे, आंचळगाव, चहुत्रे, पळासखेडा या परिसरात ढग फुटीसारखा पाऊस पडल्याने धोत्रे-उमरे गावाजवळ असलेला पाझर तलाव फुल्ल भरून तो पाझर तलाव फुटल्याने फरशी पूल वाहून गेला तर परिसरातील शेतांसह पीक वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प होऊन गावांचा संपर्क तुटला आहे. याबाबत आमदार चिमणराव पाटील व कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती मधुकर पाटील यांनी तहसीलदार अनिल गवांदे यांना नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून सरसकट पंचनामे करण्याचे सांगून ओला दुष्काळ जाहीर करा अश्या सूचना दिल्यात.

शेतकरी संकटात

शेतकरी कापूस पिकावर अनेक प्रकारचे आजार आल्याने विविध फवारणी करून कंबरडे मोडले आता पावसाने कहर केला असून तोंडी आलेला घास हिरावून नेला त्यात मंगरूळ, धुळपिप्रि परिसरात रानडुकरांसह जंगली प्राण्यांनी पिकांचे नुकसान करणे सुरू केले आहे. शेतकरी सर्वांकडून संकटात सापडला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com