गाव तेथे क्वाॅरंटाईन सेंटरची मागणी

जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
गाव तेथे क्वाॅरंटाईन सेंटरची मागणी
कोविड सेंटर

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता, गाव तेथे क्वारंटाईन सेंटर उभारावे अशी मागणी राजपूत करणी सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष मोहनसिंग पवार यांनी केली आहे. त्यासंबंधीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषद शाळेचा ऊपयोग क्वारंटाईन सेंटर म्हनुण केल्यास रूग्ण संख्या कमी करता येऊ शकते व रूग्ण गावातच राहील्याने घरचा डबा, घरचीच खाट असल्याने कमी खर्चात ज्यास्त पेशंट बरे होतील, अशी उपाय योजना करने काळाची गरज आहे. कोवीड पेशंट प्रथम अवस्थेत उपचार करणे गरजेचे आहे.

लक्षण दिसताच चाचणी करून औषध उपचार केल्यास पेशंट प्रथम अवस्थेत लवकर बरा होतो. हे आता सर्वानाच समजल आहे. गावतील प्रतिष्ठत लोकानी, तरुणांनी मनावर घेतल्यास हे सहज शक्य आहे दुसरे आणखी एक, पेशंट देखभाल गावातील, अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा वर्क्स, नर्स, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत शिपाई, कोतवाल, ह्याना शासकीय आदेश दिले, तर काम फार सोपे होईलअसे केल्याने खेड्यातली परीस्थितीलवकर सुधारणा होईल. या निवेदनावर मोहनसिंग पवार (पवार सर) यांची स्वाक्षरी आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com