चोरीच्या १९ दुचाकींसह दोघांच्या मुसक्या आवळल्या

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, दुचाकी गहाण ठेवून मिळवायचे पैसे
चोरीच्या १९ दुचाकींसह दोघांच्या मुसक्या आवळल्या

जळगाव - Jalgaon

जिल्ह्यात पाचोरा, पहूर, पिंपळगाव हरेश्‍वर, जामनेसह विविध ठिकाणांहून दुचाकी चोरणार्‍या आरीफ शरिफ तडवी वय २४ रा. गणेश नगर, पहूर ता. जामनेर (Jamner) व चेतन संजय चव्हाण वय २३ रा.लोहारा ता.पाचोरा या दोघांना शनिवारी अटक केली आहे. दोघांकडून चोरीच्या १९ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. दुचाकी चोरीनंतर त्या गहाण ठेवून चोरटे पैसे मिळवित असल्याची माहिती समोर आली आहे.

दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना पहूर येथील आरीफ तडवी हा दुचाकी चोरी करत असल्याची माहिती मिळाली.

१६ दुचाकी चोरीचे गुन्हे उघड

त्यानुसार सहाय्यक फौजदार अशोक महाजन, रवि नरवाडे, महेश महाजन, किशोर राठोड, रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख, , विनोद पाटील, , उमेशगीरी गोसावी, ईश्वर पाटील, हेमंत पाटील, दिपक चौधरी, मुरलीधर बारी, अशोक पाटील यांच्या पथकाने आरीफच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून साथीदाराची माहिती मिळालवर चेतन चव्हाण यालाही अटक करण्यात आली. दोघांकडून १९ चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत पाचोरा येथील आठ, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे ३, जामनेर पोलीस स्टेशनचे २, पिंपळगाव हरेश्‍वर २ व पहूर पोलीस स्टेशनमधील १ असे दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

Related Stories

No stories found.