बंद घराच्या खिडकीतून प्रवेश करीत चोरट्यांनी लांबवला ऐवज

नशिराबाद येथील घटना
बंद घराच्या खिडकीतून प्रवेश करीत चोरट्यांनी लांबवला ऐवज
चोरी

जळगाव - Jalgaon

तालुक्यातील नशिराबाद (Nashirabad) येथील परकोट मोहल्ला येथे चोरट्यांनी बंद घराच्या खिडकीतून प्रवेश करीत घरातून ६३ हजार १०० रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, नजरुल इस्लाम खलील अहमद (रा. परकोट मोहल्ला, नशिराबाद) यांच्या घरी ही चोरी झाली आहे. नजरुल इस्लाम यांच्यासह कुटुंबीय ३ सप्टेबर रोजी बाहेरगावी गेले होते. त्यांच्या बंद घराच्या खिडकीतून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. बेडरुममधील कपाटाचे लॉकर तोडून ६३ हजार १०० रुपयांचे दागिने व रोख रक्कम लांबवली. ९ सप्टेबर रोजी रात्री ८ वाजता कुटुंबीय घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी इस्लाम यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नशिराबाद पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहन चौधरी तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com