महिलेच्या गळ्यातील पोत हातोहात चोरली

चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल
महिलेच्या गळ्यातील पोत हातोहात चोरली

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी-

किरणा सामान घेण्यासाठी आलेल्या महिलेला women ऐकट्यात गाठुन, पोलीस police असल्याची बतावणी करुन, दोघा भामट्यांनी हातचालाखीने महिलेच्या गळ्यातील In the neck ५२ हजार ५०० रुपयांची सोन्याची gold texture पोत लंपास केली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

अशालता कल्याणसिंग चव्हाण(रा.महावीर कॉलनी, जुने विमान तळ) या दि,७ रोजी किरणा सामान घेण्यासाठी शहरातील स्टेशन रोडवरील भारती प्रोव्हीजन येथे आल्या होत्या. किरणा घेतल्यानतंर ऍड.शेलेंद्र पाटील यांच्याकडे कामनिमित्ताने जाण्यासाठी दत्तावाडी येथे जाण्यासाठी निघाल्या असता, दोन भामटे काळ्या रंगाच्या पलसर गाडीवर आले.

त्यांनी महिलेल्या आम्ही पोलीस आहोत, शहरात चोर्‍या होत आहे. तुम्ही गळ्यात इतकी किमती सोन्याची पोत घालून जात आहात, ती चोरी होण्याची शक्यता आहे. पोत काढुन पर्समध्ये ठेवा असे सांगीतले. महिलेने तिच्या गळ्यात ५२ हजार ५०० रुपये किमतीच १६ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत काढल्यानतंर आम्ही पर्समध्ये ठेवतो, असे सांगून हातचालाखीने पोत लपास केली. आणि तेथून भामटे पसार झाले.

महिलेने पुढे पर्स उघडून पाहिल्यानतंर पोत चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला आशालता चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोकॉ.राहुल सोनवणे हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com