जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

आमच्या सोबत चाल नाही तर चॉपरने मारुन टाकू अशी धमकी देत तरुणाला मारहाण केल्याची घटना 31 डिसेंबर 2020 रोजी घडली होती.

याप्रकरण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल होता. यातील दोघ संशयित आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी मध्यप्रदेशातील शहापूर येथून अटक केली असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सूनावली आहे.

शहरातील गणेशवाडीतील अल्पवयीन तरुणाने काही तरुणांसोबत भांडण झाले होते. हे भांडण मिटवून घेवू असे म्हणत भुषण विजय माळी व पवन बाविस्कर उर्फ बटू यांनी त्या तरुणाला मोटारसायकलवर बसण्यास सांगितले. परंतु तो तरुण येण्यास तयार नसल्याने भूषण माळीने त्या तरुणाला चॉपर दाखवित नाही आला तर तुला चॉपरने मारुन टाकेल अशी धमकी दिली.

त्यानंतर भूषण उर्फ भासा विजय माळी, आकाश उर्फ आक्या ब्रो रविंद्र मराठे, पियुष उर्फ वाघ्या मुकूंदा ठाकूर व पवन दिलीप बाविस्कर हे चौघ पुन्हा त्या तरुणाच्या घराजवळ येत आम्ही या एरियाचे दादा आहे तू आमच्या नादी लागू नको तुला महागात पडेल असे म्हणत भूषण माळीने त्याठिकाणी पडलेली फरशी त्या अल्पवयीन तरुणाच्या डोक्यात मारली तर इतर तिघांनी त्याला चापडा बुक्क्यांनी बेदम मारहाण करीत जखमी केले याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.

एकास अटक तर तिघे होते फरार

गुन्हा दाखल होताच एमआयडीसी पोलिसांनी आकाश रविंद्र मराठे (वय 21) रा. हनुमान मंदिर तुकारामवाडी याला अटक केली असून तो अद्याप न्यायालयीन कोठडीत असून इतर तिघ गुन्हा घडल्यापासून फरार होते.

मारहाण करणारे सराईत गुन्हेगार

मारहाण करणारे चौघ संशयित आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर जिल्हापेठ, एमआयडीसी पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहे. यात भूषण माळी याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. अटकेतील संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल देखील जप्त करण्यात आली आहे.

शहापूर येथून दोघांना घेतले ताब्यात

गुन्हा दाखल झाल्यापासून तिघे संशयित आरोपी फरार होते. यातील दोन आरोपी मध्यप्रदेशातील शहापूर येथे असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना मिलींद सोनवणे, सुधीर साळवे व विजय बावस्कर यांनी शहापूर येथून भूषण उर्फ भासा विजय माळी (वय 20 रा. हनुमान मंदिर तुकारामवाडी) व पवन दिलीप बाविस्कर (वय 20 रा. हनुमान मंदिर तुकारामवाडी) या दोघांना अटक केली असून यातील पियुष उर्फ वाघ्या मुकूंदा ठाकूर हा अद्याप फरार आहे. अटक केलेल्या संशयितांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. पुढील तपास अतुल वंजारी, सचिन पाटील हे करीत आहे.