तेरा वर्षीय मुलाचा प्रामाणिकपणा

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचा गहाळ झालेला 50 हजारांचा मोबाईल केला परत
 तेरा वर्षीय मुलाचा प्रामाणिकपणा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

मॉर्निंग वॉकसाठी (Morning walk) गेलेल्या महिलेचा (Women) 50 हजार रुपये किंमतीचा मोबाईल गहाळ (Missing mobile) झाला. हा मोबाईल पेपर वाटप (Paper distribution) करणार्‍या इयत्ता सातवीतील देवांशू दीपक सुर्यवशी (Devanshu Deepak Suryavashi) या विद्यार्थ्याला सापडला. या चिमुकल्याने या मोबाईल मधील क्रमांकावर संपर्क साधत त्या महिलेला महागडा मोबाईल परत करीत आपल्या कष्टाळू व प्रामाणिक पणाच्या वृत्तीचे दर्शन घडविले.

शहरातील पिंप्राळ्यातील बारी वेल्डिंग जवळील देवांशू दीपक सुर्यवशी हा चिमुकला सेंट लॉरेंन्स स्कुलमध्ये इयत्ता 7 वी मध्ये शिकत आहे. सध्या शाळा बंद असल्याने तो चिमुकला दांडेकर नगर येथून पेपर वाटप करुन अपल्या आई वडीलांना मदत करीत आहे. दरम्यान शनिवारी 11 रोजी सकाळी 5.30 वाजता पिंप्राळा दांडेकर नगर येथून सायकलने पेपर वाटपसाठी जात असताना त्याला पिंप्राळारोडवरील भवानी मंदिराजवळ मॉर्निंग वॉकला जाणार्‍या आशा मौर्या रा. दांडेकर नगर यांचा 50 हजार किंमतीचा मोबाईल सापडला. या चिमुकल्याने बराचवेळ परिसरात त्या महिलेचा शोध घेतला मात्र त्या मिळून आल्या नाही.

संपर्क साधत घडविले प्रामाणिक पणाचे दर्शन

चिमुकल्याला सापडलेल्या मोबाईल हा महागडा असल्याने तसेच तो एकाच बटणावर ऑपरेट होत होता. तसेच या मोबाईला लॉक नसल्याने त्या चिमुकल्याने रस्त्याने जाणार्‍या एका तरुणाच्या मदतीने त्या महिलेने रात्री फोन केलेल्या नंबरवर संपर्क साधत त्यांचा मोबाईल आपल्याला सापडल्याचे सांगितले. दरम्यान त्या आशा मौर्या यांनी आपण दांडेकरनगरात राहत असल्याचे सांगितल्यानंतर तो चिमुकला पहाटे सव्वा साडेपाच वाजेच्या सुमारास मोबाईल घेवून त्या महिलेच्या घरी जावून त्याने सापडलेला मोबाईला परत करीत प्रामाणिक पणाचे दर्शन घडविले.

प्रामाणिक पणासह कष्टाळू वृत्तीचे कौतुक

देवांशू याचे वडील दीपक सुर्यवंशी यांची सीसीटीव्ही बसविण्याची एजन्सीज आहे तर आई गृहीणी आहे. सध्या शाळा बंद असल्याने देवांशू हा आई वडीलांना आर्थीक मदत म्हणून सकाळच्या सुमारास शिवाजी शिंदे यांच्याकडे पेपर वाटपाचे काम करतो. त्याला सापडलेला महागडा मोबाईल त्याने परत केल्याने त्याचे सर्वांकडून कष्टाळू वृत्ती व प्रमाणिक पणासाठी सर्वांकडून त्याचे कौतुक होत आहे. तसेच या महिलेने देवांशूच्या प्रामाणिकपणामुळे त्याला पाचशे रुपये भेट स्वरुपात दिले.

तीन महिन्यांपासून करतो पेपर वाटपाचे काम

देवांशू हा आई वडीलांकडे वारंवार खाऊला पैसे मागत असल्याने त्याच्या आईने त्याला पैसे कमविण्यासाठी किती कष्ट करावे लागतात याबद्दल त्याला बोलून दाखविले. दरम्यान तेव्हा पासून देवांशू हा गेल्या तीन महिन्यांपासून पेपर वाटपाचे काम करीत आहे. दरम्यान पैसे वाटपातून मिळाणार्‍या पैशांतून तो आपल्या खाऊसाठी हे पैसे खर्च करीत असतो.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com