घरातील ज्येष्ठ नागरिकच कुटुंबाचे ठरतात आधारस्तंभ

जि.प.अध्यक्षा रंजना पाटील यांचे मत; ज्येष्ठ नागरिक सहाय्यता दूत प्रशिक्षणाचा समारोप
घरातील ज्येष्ठ नागरिकच कुटुंबाचे ठरतात आधारस्तंभ

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

घरातील जेष्ठ नागरिक senior citizens हे कुंटुबाचे आधारस्तंभ Pillar of the family असतात. त्यांची गरज काय असते त्यांना वेळेवर जेवन, चहा-पाणी, औषधोउपचार या पलिकडे त्यांच्या काही अपेक्षा नसतात. हीच सेवा त्यांना दिली तर मला वाटते मंदिरात जाण्याची गरज नाही. त्यांच्या सेवतच खरा आंनद असल्याचे मत जिल्हा परिषदच्या अध्यक्षा रंजना पाटील Zilla Parishad President Ranjana Patil यांनी व्यक्त केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University आजीवन व अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने सुरू असलेल्या ज्येष्ठ नागरिक सहाय्यता दूत Senior Citizen Assistance Envoy प्रशिक्षण शिबीराचा समारोप आज करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या.

समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार होते. तर व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद उपस्थित होते.

यावेळी बोलतांना डॉ. जयप्रकाश रामानंद म्हाणाले की, ज्येष्ठ नागरिक दूत म्हणून आपण आज प्रशिक्षण घेऊन बाहेर पडत आहात. समाज ही तूमची प्रयोगशाळा असून आपले स्कील त्या ठिकाणी वापरावयाचे असल्याचे ते यावेळी म्हणाले. त्यानंतर दिलीप पाटील,प्रभारी प्र- कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार यांनी मनोगत व्यक्त केले.

त्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांमधून तेजस्वीता जाधव व हेमंत देवरे यांनी तर जेष्ठ नागरिकांतून अरूण माळी व डी.टी.चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी समाजकार्याचा 02 वर्षांचा प्रवास आणि वैयक्तिक समाज कार्य हा शोधनिबंध सुर्वणा दिलीप पाटील हीने सादर केला. यावेळी शिबिरात सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. मनिष जोशी यांनी केले. सुत्रसंचालन सुभाष पवार यांनी केले.

प्रशिक्षण शिबीराच्या कालावधीत सहाय्यता दूत आवश्यकता व मानसिकता, व्यक्तीमत्व, संवाद कौशल्य, समुदेशन कला, व्यावहारीक कौशल्य, या विषयांवर प्रा.व्ही.व्ही.निफाडकर, टी.डी.चौधरी, प्रा.विकेक काटदरे, हेमंत भिडे, प्रा.डॉ.संदिप चौधरी, डॉ.विजयश्री मुठ्ठे, गिरीष कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com