रावेर|प्रतिनिधी Raver

रावेर-यावल तालुक्यातील ८५ टक्के डॉक्टरांना अद्यापही कोविंशिल्ड लस न देण्यात आल्याने, डॉक्टरच सुरक्षित नाहीत तर पेशंटला कशी सेवा द्यावी? हा प्रश्न डॉक्टरांच्या संघटना जिल्हाधिकारी यांना विचारत आहे.

जानेवारीमध्ये सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविंशिल्ड रावेरात उपलब्ध झाल्या,यासाठी ऑनलाइनपद्धतीने नोंदणी केलेल्या खाजगी डॉक्टर्स,त्यांचा स्टाफ यांना अद्याप लस मिळाली नाही, रँडम पद्धतीने लस दिली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने डॉक्टरांच्या शिष्टमंडळाला सांगितलं, पण अद्यपही रावेर व परिसरात सेवा देणाऱ्या डॉक्टर व त्यांच्या स्टाफला अद्याप लस दिली गेली नसल्याने,कोरोना काळात देखील सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर वाईट प्रसंग आला तर याची जबाबदारी कोण घेईल.

पोलीस,शिक्षक, शासकीय कर्मचारी यांना लस दिली गेली, मात्र रुग्णांच्या थेट संपर्कात येणारे डॉक्टर लसीकरणा पासून वंचित आहे.डॉक्टर व त्यांच्या स्टाफ ला लस देण्याबाबत कोणतेही नियोजन दिसत नसल्याचा आरोप डॉक्टरांच्या संघटना करत आहे. याबाबत रावेर येथील डॉ.दत्तप्रसाद दलाल ,डॉ.गुलाबराव पाटील, डॉ.मिलिंद वानखेडे, डॉ. भगवान कुयटे, डॉ.योगेश महाजन यांनी नोडल ऑफिसर डॉ एन डी महाजन यांना निवेदन देऊन याबाबत नाराजी प्रकट केली आहे.