पत्रकार, छायाचित्रकारांचा सन्मान
पत्रकार, छायाचित्रकारांचा सन्मान|रोटरी
जळगाव

पत्रकारांची भुमिका महत्वाची-जी.आर.ठाकूर

रोटरीतर्फे पत्रकार, छायाचित्रकारांचा सन्मान

Ashish Patil

Ashish Patil

भुसावळ - Bhusawal

आपल्या आजुबाजुला काही बरेवाईट झाल्यास पत्रकार आपल्या परिवाराला सोडून वेळेची काळजी न करता धावत येतो.प्रत्येक घडामोडीत पत्रकारांची भुमिका महत्वाची असते असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ भुसावळचे अध्यक्ष जी.आर.(मामा) ठाकूर यांनी केले.

ते आज दि.२७ रोजी रोटरी क्लब ऑफ भुसावळ व बी.ए.लाहोटी चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने रोटरी भवनात आयोजित कार्यक्रमात कोरोना कर्मविर सन्मान कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी अरूण मांडळकर होतेे. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष जी.आर.ठाकूर, माजी अध्यक्ष राजेश अग्रवाल, , महेश भराडे, सतिश अग्रवाल, राजेश जोशी, गोपाल तिवारी, खुशाल जोशी, मदन बोरकर, सारंग चौधरी या मान्यवरांच्या हस्ते पत्रकार व छायाचित्रकारांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी संजयसिंग चव्हाण, शेख सत्तार, आशिष पाटील, प्रेम परदेशी, अभिजीत आढाव, निलेश फिरके, संजय काशीव, शाम गोविंदा, हबीब चव्हाण, कमलेश चौधरी, सुनिल सूर्यवंशी, संतोष शेलोडे, कालू शाह, शकील पटेल, संजय ठाकूर, कलीम पायलट आदी पत्रकार व छायाचित्रकारांना शाल, सॅनीटायझर, मास्क व कोरोना योध्दा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी जी.आर.ठाकूर पुढे म्हणाले कि,प्रत्येकाच्या सु:खदुखा:त पत्रकार नेहमी धावून येत मदत करतात मात्र पत्रकारांनाच समाज विसरतो. सर्वसामान्य जनतेला मदत करणार्‍या पत्रकारानंतर पुढील टप्प्यात पोलीस, महसूल, नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी व सफाई कामगारांचा लवकरच कोव्हीड १९ योध्दांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे ठाकूर म्हणाले.

अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना अरूण मांडाळकर यांनी सांगितले कि, सर्वच संघटनांना नेहमी पत्रकारांची कुठल्याही मदतीची अपेक्षा न ठेवता मदत मिळते. त्यामुळे असे लॉकडाऊन मुळे छोटेखानी का नसो पत्रकारांसाठी हे कार्यक्रम व्हायला पाहिजे असे स्पष्ट केले.कार्यक्रमासाठी राधेश्याम लाहोटी,आरती चौधरी यांचेही सहकार्य लाभले. आभार राजेश अग्रवाल यांनी केले. यशस्वीतेसाठी मनोज गुलईकर यांनी परिश्रम घेतले.

Deshdoot
www.deshdoot.com