निकाल
निकाल
जळगाव

मुलींचाच डंका : जळगाव जिल्ह्याचा ९३.५१ टक्के निकाल

शाळा, सायबरकॅफ बंद असल्याने मोबाईलवरच बघीतला रिझर्ट

Rajendra Patil

जळगाव - Jalgaon

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने नाशिक विभागीय मंडळामार्फत मार्च २०२० मध्ये आयोजित केलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल (इयत्ता १०वी) मंडळाचा अधिकृत संकेत स्थळावर बुधवार दि.२९ जुलै रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला.

विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेत नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या चार जिल्ह्याचा समावेश आहे. मार्च २०२० मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकालात नाशिक येथे ४७ हजार ४९५ विद्यार्थ्यांपैकी ४० हजार ०९८ उत्तीर्ण झाले असून ९६.४२ टक्के निकाल लागला आहे. धुळे येथे १६ हजार ५९९ विद्यार्थ्यांपैकी ११ हजार ८९९ उत्तीर्ण झाले असून ९६.११ टक्के निकाल लागला आहे.

जळगाव जिल्ह्यात ३३ हजार ७५१ विद्यार्थ्यांपैकी २४ हजार १५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ९५.४० टक्के निकाल तर नंदुरबार जिल्ह्यात ११ हजार २७६ विद्यार्थ्यांपैकी ८हजार ६८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ९०.७० टक्के निकाल लागला आहे. या परीक्षेत मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com