नियमांपेक्षा जास्त उंचीची मूर्ती घेत मिरवणूक काढणे भोवले

बळीरामपेठेतील मंडळाच्या पदाधिकार्‍यांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल
नियमांपेक्षा जास्त उंचीची मूर्ती घेत मिरवणूक काढणे भोवले
Crime

जळगाव - Jalgaon

शासनाने ठरवून दिलेल्या नियमापेक्षा जास्त मोठी मूर्ती तयार केली व मंडळाच्या पदाधिकार्‍यांनीही मिरवणूक काढून त्या मुर्तीची स्थापना केली म्हणून जळगाव शहरातील बळीराम पेठेतील आझाद क्रिडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्षांसह पदाधिकारी व मूर्तीकार अशा पाच जणांविरुध्द शुक्रवारी रात्री शहर पोलीस (police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना (corona) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने यंदा देखील मिरवणूकांवर बंदी घालून सार्वजनिक मंडळांसाठी चार फुट तर घरगुतीसाठी २ फुट उंचीची मूर्ती स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत. या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. असे असतानाही रिंगरोडवरील एलआयसी कॉलनीतील राजेंद्र राणा यांना सात फूट उंचीची मूर्ती तयार केली.

बळीराम पेठेतील आझाद क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी याच मूर्तीची टॉवर चौकापासून वाजतगाजत मिरवणूक काढून मुर्तीची स्थापना केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी गोपनीयचे सहायक फौजदार भरत प्रल्हादसिंग पाटील व नरेंद्र अशोक ठाकरे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता त्यात तथ्य आढळून आले. त्यामुळे नरेंद्र ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बळीराम पेठेतील आझाद क्रिडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अश्वीन सुरेश भोळे, उपाध्यक्ष विपीन दीपक पवार, खजिनदार रुपेश राजेंद्र पाटील, सचिव राहूल गजानन घोरपडे (सर्व रा.बळीराम पेठ) यांच्यासह मूर्तीकार राजेंद्र चंदूलाल राणा या पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आ

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com