तामसवाडी गाव पुर्नवसनाचा प्रश्‍न मार्गी

खासदार उन्मेष पाटील यांच्या पाठपुराव्युळे पुर्नवसानची समस्या सुटली
तामसवाडी गाव पुर्नवसनाचा प्रश्‍न मार्गी

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

राज्यातील सर्वात वेगाने पूर्ण होणारा, खान्देशच्या सिंचन क्षेत्रातील महत्वाकांक्षी ठरलेला तालुक्यातील वरखेडे-लोंढे प्रकल्पाच्या अंतर्गत तामसवाडी गावठाणाच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित होता. यासाठी तत्कालीन आमदार तथा खासदार उन्मेश पाटील, विद्यामान आमदार मंगेश चव्हाण यांनी यासाठी खंबीर पाठपुरावा केला होता. माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून, याबाबत पाठपुरावा केला होता. आज तब्बल २६ कोटी रूपयांच्या तरतुदीला राज्य शासनाने मंजुरी दिल्याने तामसवाडी ग्रामस्थांच्या पुनर्वसन समस्या मार्गी लागल आहे.

तालुक्यात गिरणा नदीवर मध्यम स्वरूपाच्या वरखेडे-लोंढे प्रकल्पाच्या काम अंतिम टप्प्यात असून यामुळे ३५.३८ दलघमी इतक्या पाण्याचा साठा होणार आहे. गिरणा खोर्‍यातील ३१ गावांना लाभ होणार आहे. असे असतांना सुरुवातीला तामसवाडी गाव प्रकल्पात जाणार नसल्याचे पाटबंधारे खात्याने सांगितले होते. मात्र प्रकल्प पूर्णत्वाकडे येत असतांना तामसवाडीच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न मार्गी लावावा अशी मागणी तामसवाडी येथील ग्रामस्थांनी तत्कालीन आमदार तथा विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांच्यासह माजी पालकमंत्री गिरीश महाजन तसेच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे केली होती. याबाबत राज्य सरकारने आधी अंशत: मान्यता दिली होती.

१००टक्के मान्यता मिळावी. यासाठी तत्कालीन आमदार तथा खासदार उन्मेश पाटील यांनी पुनर्वसन समितीची दि.१३/०४/२०१८ पहिली बैठक घेतली होती. तसेच ४/१२/२०१८ जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या सोबत बैठकीत, या विषयाचा खंबीर पाठपुरावा करून तेथील ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकारला विनंती केली होती. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देखील राज्य पुनर्वसन प्राधिकरणाची मंत्रालय स्तरावरून बैठक घेण्याबाबत विनंती केली होती.

सर्व पाठपुराव्याचे फलित पदरात पडले असून आज सकाळी मुंबईत महाराष्ट्र राज्य पुनर्वसन आणि पुनर्स्थापना सनियंत्रण समितीची बैठकीचे व समितीचे पदसिध्द अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात निमंत्रीत सदस्य या नात्याने राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची देखील उपस्थिती होते.

या बैठकीत वरखेडे-लोंढे प्रकल्पात तामसवाडी या गावाचे १०० टक्के पुनर्वसन होणार असून यासाठी २५ कोटी ८९ लाख रूपयांची तरतूद करावी अशी मागणी मान्य करण्यात आली असून यामुळे तामसवाडीकरांची प्रदीर्घ काळापासून प्रलंबीत असणारी मागणी पूर्ण झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com