उपचार घेत असतांना खिडकीची जाळी तोडून कैद्याचे पलायन

नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल
उपचार घेत असतांना खिडकीची जाळी तोडून कैद्याचे पलायन

जळगाव - Jalgaon

डॉ उल्हास पाटील रुग्णालयातील (Dr. Ulhas Patil Hospital) चौथ्या मजल्यावरील कैदी वार्डातून उपचारादम्यान खिडकीची जाळी तोडून कैदी शंकर रविंद्र चौधरी उर्फ रहिम नज्जू पठाण वय २० रा. शिवकॉलनी धर्माराव कुुंडीचाळ, (Chalisgaon) चाळीसगाव याने पलायन केल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी पहाटे पावणे पाच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी (Nashirabad Police) नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकार लक्षात आल्यानंतर वार्डाबाहेर तैनात असलेल्या (Nashirabad Police) पोलिसांनी नशीराबाद पोलिसांना माहिती दिली. नशिराबाद पोलिसांनीही घटनास्थळ गाठून माहिती घेतली, तसेच पळून गेलेल्या कैदी शंकर चौधरी याचा संशयितांचा परिसरात शोध घेतला. मात्र मिळून आला नाही. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरेश सपकाळे यांच्या फिर्यादीवरुन नशीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com