कांद्याला कवडीमोल भाव
जळगाव

कांद्याला कवडीमोल भाव

बाजार समित्या बंदीचा फटका

Rajendra Patil

गतवर्षी आवक सरासरी 3 हजार क्विंटल होती. यावर्षी रब्बी हंगामातील कांदा उत्पादन आवक 300 ते 400 क्विंटलने जात आहे. शेतकर्‍यांना किमान हजार ते बाराशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे कांदा उत्पादनाचा दर मिळाल्यास परवडण्याजोगे असते. परंतु दर मात्र अपेक्षेपेक्षा कमी आहेत, असे चाळीसगाव कृउबा सचिव सरदारसिंग पाटील यांनी सांगितले

जळगाव । प्रतिनिधी

यंदा खानदेशात तसेच जिल्ह्यात कोरणा साथरोग प्रादुर्भाव अंमलबजावणीमुळे स्थानिक तालुका पातळीवरील कृषी उत्पन्न बाजार समित्या बराच काळ बंद होत्या. सद्यस्थितीत कांद्याला समाधानकारक दर मिळत नसल्याने रब्बी हंगामातील कांदा शेतकर्‍यांकडे अद्याप पडून आहे. शिवाय गेल्या महिन्याभरापासून दमट व उष्ण हवामान असल्याने खरीपातील नविन कांदा लागवड गतवर्षापेक्षा यावर्षी कमी होण्याची शक्यता आहे.

खरीप कांदा लागवडीत होणार घट

कोरोना प्रादुर्भावामुळे शेतमाल विक्रीसाठी बाजार समित्या मध्यंतरीच्या कालावधीत 23 मे पर्यंत बंद होत्या. परिणामी कांदा उत्पादन देखील बाजारपेठेत येऊ शकले नाही. सध्या कोरोनाच्या भीतीमुळे मजूर वर्गदेखील काम करण्यास धजावत नाही. बर्‍याच शेतकर्‍यांकडे कांदा रोपे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असली तरी खरीप हंगामातील कांदा लागवडीवर परिणाम होणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com