रावेर|प्रतिनिधी Raver

तालुक्यातील पाच गांवाच्या सरपंच पदाच्या आरक्षण बदलासाठी मंगळवारी काढण्यात आलेल्या सोडतीत सरपंचपदाचे आरक्षण बदलवण्यात आले आहे.तर रेंभोटा येथील आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे.

येथील तहसिल कार्यालयात विवरे खुर्द,भोर, सुदगांव, मस्कावदसीम,रेंभोटा या ठिकाणच्या फेरआरक्षणाची सोडत प्रांतअधिकारी कैलास कडलग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नामप्र व अनुसूचित जाती या अशा दोन जाती प्रवर्गाच्या चिठ्ठी टाकून कु. तेजस्विनी प्रवीण पाटील या बलिकेच्या हातून चिठ्ठी काढून सोडत जाहीर झाली.

यात विवरे खुर्द व मस्कावदसीम येथे ओबीसी महिला, भोर येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग, सुदगांव याठिकाणी अनुसूचित जाती,तर रेंभोटा येथील अनुसूचित जमाती आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे.या ठिकाणी प्रभाग १ मध्ये सर्वसाधारण जागेवर निवडून आलेल्या सपना आनंदा सपकाळे यांच्याकडे जात प्रमाणतपत्र असल्याने,त्यांनी सादर केलेल्या अर्जावरून जिल्हाधिकारी यांच्याकडे मार्गदर्शनासाठी प्रस्ताव पाठवणार असल्याचे प्रांत अधिकारी श्री कडलग यांनी घोषित केले. या आरक्षण सोडतीसाठी तहसीलदार उषाराणी देवगुणे व सि जी पवार यांचे सहकार्य लाभले.