मुलीच्या मृत्यूस कारणीभूत संशयित आई वडीलांना चार दिवसांची पोलीस कोठडी

रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल
मुलीच्या मृत्यूस कारणीभूत संशयित आई वडीलांना चार दिवसांची पोलीस कोठडी

जळगाव - Jalgaon

शहरातील पिंप्राळा हुडकोतील रझा कॉलनीत कनीज फातेमा जावीद अख्तर शेख (वय ११) या मुलीच्या मृत्यूस कारणीभूत जन्मदात्या आई नाजीया परवीन जावेद अख्तर व वडील जावेद अख्तर शेख जमालोद्दीन या दोघांविरोधात बुधवारी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येवून त्यांना अटक करण्यात आली होती. आज गुरुवारी दोघांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघानंा चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कनीज हिचा २३ रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास संशयास्पद मृत्यू झाला. वडील जावेद शेख यांनी दुसर्‍या दिवशी म्हणजेच २४ एप्रिल रोजी तिचा दफनविधी केला. ही घटना त्याने कोणालाच सांगितली नाही. नंतर घराला कुलूप लावून पत्नी व दोन्ही मुलींना घेऊन तो गायब झाला होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मयत कनिजचे मामा अजहर अली शौकत अली (रा.अमळनेर) यांनी सोमवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार होती. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी जावेद शेख तसेच मुलीची आई नाजीया या दोघांना अमळनेर येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

तक्रारीनुसार पोलिसांनी काल बुधवारी सकाळी ८ वाजता दफनविधी केलेला मुलीचा मृतदेह उकरुन काढत, त्याचे घटनास्थळावरच तहसीलदारांसमोर शवविच्छेदन करत पंचनामा केला. दोन ते तीन दिवस मुलीला घरात कोंडून ठेवून जेवण न दिल्याने भुकबळीने तिला मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण शवविच्छेदनातून समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांनी काल बुधवारी रात्री फिर्यादी होवून मुलगी कनिज हिच्या मृत्यूस कारणीभूत तिची आई नाजीया व वडील जावेद शेख या दोघांंविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. तपासधिकारी पोलीस निरिक्षक अनिल बडगुजर यांनी आज गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास संशयित आई व वडील या दोघांना जिल्हा न्यायालयता हजर केले. न्यायालयाने दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com