सामान्य रूग्णालयात उद्यापासून पुर्ववत होणार बाह्य रूग्ण सेवा कार्यान्वित

सुरक्षा व्यवस्थेसह संपर्क यंत्रणा, अंतर्गत व्यवस्थेत आमूलाग्र बदल
सामान्य रूग्णालयात उद्यापासून पुर्ववत होणार बाह्य रूग्ण सेवा कार्यान्वित

जळगाव - Jalgaon

गत सात ते आठ महिन्यांपासून कोविड प्रादूर्भावामुळे सामान्य रूग्णालयातील बाह्य रूग्णसेवा गुरूवार दि.१७ डिसेंबर पासून पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन संनियंत्रण समिती अध्यक्ष अभिजीत राउत यांनी आयोजीत पत्रकार परीषदेत दिली.

पुढे बोलतांना ते म्हणाले कि, जिल्हयात गेल्या आक्टोबर महिन्यानंतर कोरोना योद्ध्यांच्या अथक प्रयत्नातून कोविड प्रादूर्भाव नियंत्रणात आला आहे. सद्यस्थितीत कोवीडचे ॲक्टीव्ह रूग्णांवर उपचार केले जात आहेत.

परीस्थिती नियंत्रणात आल्यामुळे शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली गत १५ दिवसांपासून नॉन कोविड सेवा कार्यरत करण्याच्या दृष्टीकोनातून कार्यरत असल्याचे देखिल जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी सांगीतले.

वैद्यकिय संचालक डॉ.तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकिय महाविद्यालय आणि सामान्य रूग्णालय जिल्हयातूनच नव्हेतर राज्यातून आदर्श रूग्णालय वाटचाल सुरू आहे. या दृष्टिकोनातून रूग्णसेवांसह इतर सुविधा सुरक्षा व्यवस्थेसह संपर्क यंत्रणा तसेच अंतर्गत व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत.

रूग्णालयात बाह्य रूग्ण विभागात सकाळी ९ते १ दरम्यान ओपीडी सेवा कार्यरत रहाणार असून सकाळी ८.३०ते १२.३० वाजे दरम्यान केसपेपर काढण्याची सुविधेसह दिव्यांग रूग्णांसाठी ४ टेबल राखीव ठेवण्यात आली असल्याची माहिती दिली.

यावेळी शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय प्रशासक डॉ.बी.एन.पाटील, वैद्यकिय अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, उपअधिष्ठाता डॉ.मारोती पोटे, अधिक्षक डॉ.वैभव सोनार आदी अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com