कोरोना बाधितांच्या संख्येत घट, सोमवारी आढळले २८७ नवे रुग्ण
जळगाव

कोरोना बाधितांच्या संख्येत घट, सोमवारी आढळले २८७ नवे रुग्ण

९ रुग्णांचा मृत्यू, ३३० रुग्णांना डिचार्ज

Pankaj Pachpol

जळगाव | प्रतिनिधी Jalgaon

जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून आढळून येणार्‍या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत सोमवारी घट झाल्याचे बघावयास मिळाले. सोमवारी जिल्हयात २८७ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले. दरम्यान गेल्या पाच दिवसांपासून ५०० पार जाणारा कोरोना बाधितांचा आकडा सोमवारी कमी झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

सोमवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील ६४, जळगाव ग्रामीणमधील १५, भुसावळमधील ४, अमळनेरातील १९, चोपडा येथील ५०, पाचोर्‍यातील ४, भडगावमधील १३, धरणगावातील ११, यावलमधील १५, एरंडोल येथील ७, जामनेरातील १२, रावेर येथील ४, पारोळ्यातील २१, चाळीसगाव येथील २४, मुक्ताईनगरातील १७, बोदवड येथील ६, परजिल्ह्यातील १ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार ७७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यात ३३०रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला.

सध्या ५ हजार १३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ६७१ रुग्ण दगावले. यातील ९ रुग्णांचा नुकताच मृत्यू झाला. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात २, चाळीसगाव येथे १, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ३, गोल्डसिटी हॉस्पिटलमध्ये २, अमळनेरात १, तर रावेर येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये जळगाव शहरातील ७५ वर्षीय पुरूष, जळगाव तालुक्यातील ७२ वर्षीय पुरूष, यावल तालुक्यातील ६२ व६६ वर्षीय पुरूष, रावेर तालुक्यातील ७२ वर्षीय पुरूष व ६५,६६ वर्षीय महिला,चाळीसगाव तालुक्यातील ५८ वर्षीय पुरूष, व अमळनेर तालुक्यातील ६३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

तीघा बाधित मातांची सुखरुप प्रसुती

कोविड रुग्णालयात दाखल तीन बाधित मातांची सोमवारी सुखरूप प्रसुती करण्यात आली. जामनेर, जळगाव व अमळनेर येथील तीघा मातांना कोविह रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या तिघ ही माता गर्भवती असल्याने त्यांची प्रसुती कोविड रुग्णालयाच्या प्रसुती विभागात सुखरुप पार पडली. तीघा मातांसह बाल देखील सुखरुप असून त्यांचेवर रुग्णालयातच उपचार सुरू आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com