जिल्ह्यात अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या मंदावतेय

दिवसभरात 362 नवे रुग्ण तर 857 कोरोनामुक्त ; 9 जणांचा मत्यू
जिल्ह्यात अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या मंदावतेय
करोना अपडेट

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तसेच मृत्यू होणार्‍यांची संख्या देखील आटोक्यात आली आहे. आज दिवसभरात जिल्हाभरात कोरोनाचे 362 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तसेच 9 जणांचा मृत्यू झाला असून 857 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. बाधितांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या दुप्पट झाली आहे. तसेच अ‍ॅकटिव्ह रुग्णांची संख्या कमी झाल्याने ही जिल्हावासीयांसाठी दिलासा देणारी बाब आहे.

जिल्ह्यात आज 23 मे रोजी दिवसभरात 362 नवे बाधित रुग्ण आढळून आल्याने ती संख्या 1 लाख 38 हजार 313 एवढी झाली आहे. तर दुसरीकडे 857 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून मुक्त होणार्‍यांची संख्या ही 1 लाख 28 हजार 24 इतकी झाली आहे. नवे आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 33, जळगाव ग्रामीण 28, भुसावळ 42, अमळनेर 32, चोपडा 31, पाचोरा 2, भडगाव 2, धरणगाव 14, यावल 25, एरंडोल 2, जामनेर 27, रावेर 8, पारोळा 7, चाळीसगाव 69े, मुक्ताईनगर 19, बोदवड 17 आणि इतर जिल्ह्यातील 4 असे एकूण 362े नवे रुग्ण आढळून आले आहेत.

मृत्यू होणार्‍यांची संख्या घटली

गेल्या काही महिन्यांपासून मृत्यू होणर्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. मात्र आता मृत्यू होणार्‍यांची संख्या कमी होत असून रविवारी जिल्ह्यात 9 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जामनेर तालुक्यातील तीन, जळाव तालुक्यातील दोन तर चाळीसगाव, भडगावव धरणगाव तालुक्यातील प्रत्येकी प्रत्येकी एकाचा समावेश आतपर्यंत मृत्यू होणार्‍यांची संख्या ही 2 हजार 487 इतकी झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com