शिंदी परिसरात जोरदार पावसाची गरज

पीक स्थिती समाधान कारक : उडीद, मूग, सोयाबीन पूर्णता हातचे गेले : वन्यप्राण्यांचा त्रास
शिंदी परिसरात जोरदार पावसाची गरज

शिंदी, Shindi ता.भुसावळ । वार्ताहर

दडी मारलेल्या पावसाचे परिसरात आगमन झालेले असून शिवारात खरीप हंगामातील Kharif season पीक स्थिती सध्या समाधान कारक असून हुलकावणी दिलेल्या पावसाचे आगमन झालेले असले तरी जोरदार पावसाची need for heavy rains मात्र भविष्याच्या दृष्टीने गरज आहे.

कापूस, मका समाधान कारक असून मधल्या टप्प्यात पाऊस न आल्याने उडीद, मूग, सोयाबीन हे पीक शेतकर्‍यांच्या पूर्णताः हातून गेले आहे. त्यासाठी नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. मक्याचे मोठ्या प्रमाणावर रान डुकरे हे नुकसान करीत असतात. रानडुकरे, नीलगाय, हरीण या वन्यप्राण्यांच्या त्रासापासून पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकर्‍यांना रात्रीसुद्धा शेतात मुक्काम करावा लागत आहे दिवसभर शेतात काबाडकष्ट करणे आणि रात्री जागरण करून वन्यप्राण्यांनी पिकाचे नुकसान करू नये म्हणून जीवाची बाजी लावून पिकाची राखण करावी लागत आहे. बर्‍याच वेळेस शेती शिवारात रात्री वीज पुरवठा राहत नसल्याने अंधाराचा ही बहुसंख्य शेतकर्‍यांना सामना करावा लागतो. हरीण, रानडुकरे, नीलगाय यांचा शेती शिवारात मोठ्या प्रमाणावर त्रास असून वनविभागाने यांचा योग्य प्रकारे बंदोबस्त केल्यास शेतकर्‍यांचा त्रास काही अंशी नक्कीच कमी होईल असे शेतकरी वर्गातून सांगण्यात आले. वन्य प्राण्यांचा त्रास ही कोरडवाहू शेती शिवारातील शेतकर्‍यांची दर वर्षातील नित्याची समस्या आहे.

सध्या परिसरात कपाशी हे महत्त्वाचे नगदी पीक असून त्यासोबत मक्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केलेली आहे. कपाशीवर मिलीबग रोगाने मोठ्या प्रमाणावर आक्रमण केल्याचे शेती शिवारात दिसून येते. जोरदार पाऊस होत नसल्याने नदी, नाले आजही वाहून निघालेले नाहीत. विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही. जंगल शिवारातील, शेती शिवारातील तलाव पूर्ण क्षमतेने अजूनही भरलेले नाहीत. त्यामुळे भविष्यातील रब्बी हंगामासाठी विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होणे गरजेचे आहे.

गुराढोरांना शेती व जंगल शिवारात हिरवा चारा उपलब्ध झाल्याने चार्‍याची टंचाई मिटली आहे. शेती शिवारात मजुरांना कामे उपलब्ध असून कोळपणी, निंदणी, रासायनिक खत देणे इत्यादी कामे काही प्रमाणात आटोपली आहेत महिलांना शंभर ते सव्वाशे व पुरुषांना दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत दररोज सरासरी मजुरी मिळत असल्याचे सांगण्यात आले. रासायनिक खते, बी-बियाणे, फवारणीसाठी लागणारी औषधे यांच्या किमती काही प्रमाणात वाढल्यामुळे शेतकर्‍यांचे हंगामाचे काहीसे बजेट कोलमडले असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. साधारणपणे दर वर्षी शेती हंगामासाठी विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी कर्जाची उचल करीत असतो व हंगाम झाल्यानंतर कर्ज फेडत असतो. मात्र मागील अनेक वर्षातील अनुभव पाहता शेतकर्‍यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी न होता वाढतच असल्याने शेतकरी शेतीपासून काहीसा दुरावत असून अनेक शेतकर्‍यांनी बटाईने जमीन देणे, इतर भागातून आलेले गोरगरीब कुटुंब यांना जमीन कसायला देणे अशा पद्धतीने काही शेतकरी शेती करीत असतात वेळोवेळी गरजेनुसार मजूर उपलब्ध न होणे, मजुरांची टंचाई जाणवणे, परिसरातून नियमित रोजगारासाठी शहरांकडे जाणे हे सुद्धा त्यामागचे कारण असल्याचे सांगण्यात आले. कोरडवाहू परिसर असल्याने पाण्याची सातत्याने टंचाई या भागात असते. त्यासाठी जोरदार पाऊस दरवर्षी होणे गरजेचे असल्याचे शेतकरी अर्जुन जावळे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप कोल्हे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com