चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकसाठी १४०७ उमेदवार रिंगणात आहेत. माघारीनंतर चिन्ह वाटप झाल्याने गावोगावी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणुकींतर्गत मतदानासाठी आता तीन दिवस शिल्लक आहेत.

त्यामुळे प्रशासकीय पातळीवर मतदानाची तयारी सुरू झाली आहे. त्यानुसार शहरातील य.ना.चव्हाण महाविद्यालयात मंगळवारी ईव्हीएम यंत्रात उमेदवारांचे नाव सीलिंग व फिडिंग करण्यात आले.

आता तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींतून निवडणूक लढवणार्या १४०७ उमेदवारांची नावे मतदान यंत्रात सील करण्यात आली असून मतदारांना आपल्या चिन्हावर मतदान करण्यासाठी उमेदवारांकडून मतदारांच्या पायांची मालीश केली जात आहे.