जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

शहरातील नेहरु पुतळा परिसरात भरला जाणारा संडे बाजारावर मनपा अतिक्रमण पथकाने सायंकाळपयर्र्त बंदोबस्त ठेवल्याने हा बाजार हा रविवार 14 रोजी भरला नसल्याचे चित्र प्रत्यक्ष बाजाराच्या ठिकाणी दिसून आले. उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा अतिक्रमण पथकाने येथे सायंकाळपयर्र्त बंदोबस्त कायम ठेवला.

कोरोनाच्या काळापूर्वी संडे बाजार हा अनेक वर्षापासून भरत होता. कालांतराने कोरोनाने जवळपास 10 महिने मुक्काम केल्याने हा संडे बाजार भरत नव्हता. कोणीही हॉकर्स, विक्रेते, फूटपाथधारक येथे फिरकत नव्हते. मात्र महिन्याभरापासून येथे पुन्हा हे हॉकर्स, फूटपाथधारक, छोटेमोठे विक्रेते पुन्हा आपापल्या जागी बसू लागले होते.

अखेर मनपा अतिक्रमण पथकाने पुन्हा संडे बाजारावर लक्ष केंद्रीत करीत रविवार 14 रोजी पुन्हा येथे संडे बाजार भरण्यास विरोध केला. जर हॉकर्स, विक्रेते पुन्हा या ठिकाणी बसतील तर त्यांचेवर कारवाई करा असे आदेश उपायुक्त वाहुळे यांनी दिल्याचे समजते. त्यानुसारच येथे अतिक्रमण विभागाने ठाण मांडून हा बाजार भरण्यास विरोध केला.

कोरोनाच्या अगोदर तत्कालीन उपायुक्त अजित मुठे यांनी येथे कारवाई केली होती. तेव्हापासून येथे संडे बाजार भरणे बंद झाले होते. या संडे बाजारातील दुकानदार, विक्रेते यांनी कुठलीही परवानगी न घेता ते येथे व्यवसाय करतात असे मनपाच्या अधिकार्यांकडून समजले. या दुकानदार, विक्रेते यांना दुसर्या ठिकाणी बसण्यासाठी इतर टिकाणी जागेची व्यवस्था केली होती मात्र हे दुकानदार, व्यावसायिक यांनी दुसर्या ठिकाणची जागा मनपस सूचविली नाही असेही समजते.

नेहरु पुतळ्याजवळील संडे बाजाराचे ठिकाण हे वर्दळीच्या ठिकाणी आहे. येथे नेहमी होणारी वाहतुक ही मोठ्या प्रमाणावर असते तसेच हे ठिकाण मोक्याच्या ठिकाणी असल्याने या संडे बाजारामुळे वाहतूक वरही परिणाम होतअसते. छोटे मोठे अपघाताची शक्यता येथे नाकारता येत नाही.

आधीच कोरोनाचा काळ असल्याने येथे संडे बाजार भरविणे योग्य नसल्याने मनपा अतिक्रमण पथकाने ही कारवाई करीत संडे बाजार येथे भरु दिला नाही. तसेच सध्या शाळा, महाविद्यालये सुरू असल्याने तसेच काही महाविद्यालयीन वर्गही लवकरच सुरू होणार असल्याने येथे भरल्या जाणार्या संडे बाजारास मनपा अतिक्रमण पथकाने विरोध दर्शवला आहे. अतिक्रमण पथकाचे नाना कोळी, किशोर सोनवणे, मुकेश सोनवणे व इतर कर्मचारी येथे उपस्थित होते.