जळगाव - Jalgaon

ग.स.सोसायटीत पैसे भरण्यासाठी आलेल्या शेतकर्याची दुचाकी गोलाणी मार्केट येथून लांबविल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. आज गुरूवार ११ मार्च रोजी शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनकर दत्तात्रय पाटील रा. अहिरे बु ॥ ता. धरणगाव हे कर्जाचा हप्ता भरण्यासाठी १० मार्च रोजी दुपारी १ वाजता आला शहरातील गोलाणी मार्केट येथे आले होते. त्यांनी हनुमान मंदीराजवळ ऑप्लिटक गॅलरी दुकानासमोरील इलेक्ट्रिक डिपीसमोर आपली दुचाकी (क्रमांक एमएच १९ एआर १८६१) पार्किंगला लावली.

ग.स. सोसायटीत पैसे भरल्यानंतर ते दुचाकीजवळ आले. त्यावेळी त्यांची दुचाकी जागेवर मिळून आली नाही. गोलाणी मार्केटचा परिसरात शोध घेतला असता दुचाकी मिळाली नाही. आज सकाळी शहर पोलीसात दुचाकी चोरीची माहिती दिली.

दिनकर पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीसात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील प्राथमिक तपास पोहेकॉ प्रफुल्ल धांडे करीत आहे.