आई कामानिमित्ताने घराबाहेर पडली अन् मुलाने केली आत्महत्या

जळगावातील घटना, आत्महत्येचे कारण अस्पष्ट
आई कामानिमित्ताने घराबाहेर पडली अन् मुलाने केली आत्महत्या

जळगाव - jalgaon

शहरातील सिंधी कॉलनी (Sindhi Colony) येथे रोहन इंदरकुमार मेहता (वय-२४) या उच्चशिक्षित तरुणाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना रविवारी सकाळी ८ वाजता समोर आली आहे. काही कामानिमित्ताने आई घराबाहेर पडली अन घरी परतल्यावर तिला मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.

रोहनचे एलएलबीचे शिक्षण (Education of LLB) झाले असून (corona) कोरोना काळात लॉकडाऊन (Lockdown) असल्याने तो मुंबई (Mumbai) येथून जळगावी परतला होता. रोहन आणि त्याचा भाऊ सागर यांनी बळीराम पेठेत साडीचे दुकान सुरू केले होते. साडीचा व्ययसाय करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. रोहनची आई सुनिता ही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. यादरम्यान रोहनने घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आई सुनिता परतल्यानंतर प्रकार उघड झाला. मुलाचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. रोहनने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रोहनच्या पश्चात वडील, आई आणि एक १ मोठा भाऊ असा परिवार आहे. (MIDC Police) एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com