गिरणा धरण ९४ टक्के भरले; येत्या २४ तासात पाणी सोडणार ?

गिरणा धरण ९४ टक्के भरले; येत्या २४ तासात पाणी सोडणार ?

पाण्याच्या विर्सगासाठी धरणाचे दरवाजे उघडणार, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

जळगावसह तीन जिल्ह्यांना पाणी पुरवठा करणारे गिरणा धरणा परिक्षेत्रात झालेल्या दमदार पावासामुळे गिरण धरण आज ९४ टक्के भरले आहे. धरण क्षेत्रात सातत्याने पाऊस सुरु असल्याने येत्या २४ तासात धरणातून कुठल्याही क्षणी पाणी सोडण्यात येणार आहे.

त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशार पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच यावर्षीही मागच्या वर्षाप्रमाणे शंभर टक्के पूर्णपणे भरणार असल्यामुळे शेतकर्‍यांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

नाशिक जिल्ह्यातील हरणबारी, चणकापूर, ठेंगोडा ही धरणे पूर्णपणे भरलेली असल्याने ठेंगोडा, हरणबारी आणि चणकापूर या तिन्ही धरणातून २३०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आज दुपारपर्यंत गिरणा धरणात २०२८९ द. ल. घ. फू. म्हणजेच ९३.४५ इतका जिवंत पाणीसाठा निर्माण झाले आहे. धरणात येणारे पुराचे पाणी तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसाचा व गिरणा धरणाच्या परिचलणाचा आढावा घेऊन येत्या २४ तासात गिरणा धरणातून वाढीव पुराचे पाणी गिरणा नदीत सोडण्यासाठी धरणाचे दरवाजे आवश्यकतेनूसार उडण्यात येणार आहे. त्यामुळे गिरणा नदीला पुर येण्याची शक्यता असल्यामुळे पाटबंधारे विभागाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशार दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com