पाच लाख रुपयांसाठी विवाहितेला घरातून हाकलले

पतीसह चार जणांविरोधात रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल
पाच लाख रुपयांसाठी विवाहितेला घरातून हाकलले

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील शिवाजीनगर Shivajinagar येथील विवाहितेस Married woman माहेरुन पाच लाख रुपये आणावेत Bring five lakh rupees यासह विविध कारणांवरुन शारिरीक व मानसिक छळ करत विवाहितेला सासरच्यांनी हाकलून Expelled by father-in-law दिल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी मोहनगर येथील पतीसह सासरच्या चार जणांविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार असे की, जळगाव शहरातील शिवाजीनगर येथील अंकिता उमेश कचरे वय 25 हिचा 2017 मध्ये शहरातीलच मोहनगर येथील उमेश प्रमोद कचरे यांच्याशी विवाह झाला.

लग्नानतर काही दिवस चांगले गेल्यानंतर अंकिता हिला माहेरुन पाच लाख रुपये आणावेत अशी मागणी करुन पतीसह सासरच्यांनी मोलकरीन प्रकारे वागणुक दिली. तसे तुला राहायचे असेल तर सर्व सहन करावे लागेल, अन्यथा फारकत देवून टाक असे बोलून मारहाण करत शारिरीक व मानसिक छळ केला. तसेच सासरहून अंकिता हिस हाकलून दिले. त्यानंतर अंकिता ह्या शिवाजीनगर येथील माहेरी आल्या.

28 ऑगस्ट रोजी अंकिता कचरे यांनी छळाबाबत रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन तिचे पती उमेश प्रमोद कचरे, सासरे प्रमोद रामदास कचरे, सासू आशा प्रमोद कचरे तिन्ही रा. मोहननगर, जळगाव व चित्रा गोपाळ बाऊस्कर रा. मडगाव, गोवा या चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक चंद्रकांत पाटील हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com