Video गिरणा नदीला पूर : सावदे येथील केटीवेअर ओसंडून वाहू लागला

Video गिरणा नदीला पूर : सावदे येथील केटीवेअर ओसंडून वाहू लागला

परिसरात पूर परिस्थिती

गुढे.ता.भडगाव - वार्ताहर Bhadgaon

अर्धा जळगाव जिल्ह्याचा सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे गिरणा धरण या आठवड्यातच शंभरटक्के भरल्याने या धरणातून पाच हजार क्युसेस पाणी गिरणा नदीत सोडल्याने सावदे गावाजवळ गिरणा नदीवर बांधण्यात आलेला केटीवेअर ओंसाडून वाहत असल्याने येथे नदीला जास्तीचे पाणी असून पूर परिस्थिती दिसत असून हे पाणी बघण्यासाठी येथे परिसरातून मोठी गर्दी होत असून अनेकजण येथे या ठिकाणचे फोटो व केटीवेअर वाहत असल्याचा व्हीडीओ काढत आहेत.

गिरणा धरण नुकतेच शंभर टक्के भरले असून धरण परिक्षेत्रात होत असलेला पाऊस व या धरणावरील इतर धरणातून होत असलेला विसर्ग व मौसम,गिरणा नदीला येत असलेले पाणी लक्षात घेता पाटबंधारे विभागाने सुरुवातीला दोनच दरवाजे उघडे केले होते.पुन्हा परिक्षेत्रात होत असलेला पाऊस व पाणी परिस्थिती बघून पुन्हा धरणाचे दोन दरवाजे उघडले असून गिरणा नदीत साधारण ५ हजार क्युसेस पाणी सोडले असून गिरणा नदी दोन्ही थडी भरून वाहत आहे.

तसेच मन्याड धरण देखील शंभरटक्के भरले असून या धरणातून व खाली असलेल्या छोट्या मोठ्या नाले, ओढे खळखळून वाहत असल्याने हे पाणी सायगांंव पासून पुढे वाढत वाढत जात असून गुढे गावाजवळ नदीत साधारण ६ते७हजार क्युसेस पाणी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

येथे नदीचे सर्वात मोठे रुंद व मोठे विस्तीर्ण नदीचे वाळू पात्र झाकले गेले असून सावदे गावाजवळ गिरणा नदीवर असलेला केटीवेअर पाण्याने तुंडूब झाला असून येथे नदीला पूर परिस्थिती दिसत असून येथील केटीवेअरमधून वेगाने मोठ्या प्रमाणात खळखळून जोरदारपणे पाणी वाहत असल्याने दूरवर पाण्याचा मोठा आवाज होत आहे, म्हणून येथे पाणी व केटीवेअर बघण्यासाठी परिसरातील लोक हौशीने येथे येत पाण्याचा बघण्याचा मोठा आनंद घेत असून येथील केटीवेअरच्या पाण्याचे व्हीडिओ चित्रण व फोटो काढत असून व ते सोशलमिडीयाच्या माध्यमातून व्हायरल होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com