जळगाव - Jalgaon

तालुक्यातील पाळधी येथे तरूणीचा प्रेमविवाहाच्या दुसऱ्याच दिवशी सासरी संशयास्पद मृतदेह आढळला होता.

या घटनेच्या दिवशी विषारी औषध प्राषणाने अत्यवस्थ असलेल्या तरूणीच्या प्रियकर पती प्रशांत विजयसिंग पाटील याचाही काल रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज दि.२ जानेवारी रोजी त्याच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

घटनेच्या दिवशी प्रशांत पाटील यानेही विषारी औषध प्राशन केले होते. यानंतर त्याला जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली आहे.