वाद विकोपाला गेल्याने पतीने केली पत्नीची हत्या

 वाद विकोपाला गेल्याने पतीने केली पत्नीची हत्या

चोपडा chopda ( प्रतिनिधी )
पती,पत्नीच्या घरगुती भांडणाचा Domestic quarrels वाद शेवटी विकोपाला गेल्याने पतीने संतापाच्या husband killed his wife भरात घरातील विळ्याने पत्नीच्या उजव्या मांडीवर गंभीर घाव घातल्याने अति रक्तस्राव होऊन त्यात उपचारा पूर्वी मृत्यू झाल्याची घटना चोपड्यात रविवारी रात्री ८:१५ वाजता घडली.

या बाबत पती विरुद्ध पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.मात्र पती,पत्नीच्या भांडणाचे कारण मात्र समजू शकले नाही.खुनाच्या घटनेने शहरात प्रचंड खडबळ उडाली आहे.

चोपडा शहरातील फुलेनगर भागात संजय पुंजू चव्हाण (वय-४८),पत्नी मीराबाई संजय चव्हाण (वय-४०) व मुलगा सागर संजय चव्हाण उर्फ भोई (वय-२३) असे मोलमजूरी करणारे कुटूंब वास्तव्यास आहे.दरम्यान आज ५ सप्टेंबर रोजी रविवारी रात्री ८ वाजे च्या सुमारास पती संजय पुंजू चव्हाण याचे पत्नी मीराबाई संजय चव्हाण यांचेशी घरगुती कारणावरून कडाक्याचे भांडण झाले

पती पत्नीच्या भांडणाचा वाद विकोपाला गेल्याने संतापाच्या भरात पती संजय पुंजू चव्हाण याने घरातील विळा काढून त्याच्याने पत्नी मीराबाई चव्हाण यांच्या उजव्या मांडीवर सपासप घाव घालून गंभीर जखमी केले त्यात मीराबाई चव्हाण यांना मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने हॉस्पिटलला पोहचण्या पूर्वी त्यांचा मृत्यू झाला.

या बाबत मुलगा सागर संजय चव्हाण (भोई) यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशन ला भाग-५ गुरनं.३१८/२०२१ भादवि कलम- ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अवतारसिंह चव्हाण करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com