भुयारी गटार प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांपुढील सुनावणी लांबली

पुढील सुनावणी येत्या २२ तारखेला, श.वि.आघीलाबाजू मांडण्याची दिली संधी
भुयारी गटार प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांपुढील सुनावणी लांबली

चाळीसगाव | प्रतिनिधी

शहरवासियांसाठी अत्यंत महत्वाची १४७ कोटी रुपयांची भुयारी गटार योजनेस मजुरी मिळाली आहे.

परंतू ही योजना पूर्ण न होऊ नये म्हणून उपनगराध्यक्षा आशाताई रमेश चव्हाण व अपक्ष नगरसेविका सायली रोशन जाधव यांच्यासह शहवि आघाडीचे नगरसेवक खोळंबा घालत असल्याचा आरोप कालच पत्रपरिषदेत भाजपाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्‍वर पाटील यांच्यासह भाजपाच्या नगरसेवकांनी केला होता.

आज जिल्ह्याधिकार्‍यांपुढे याप्रकरणाची सुनावणी होती. परंतू शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी आपली बाजू मांडण्यासाठी वकिलपत्र सादर केल्याने, आता याप्रकरणाची सुनावणी येत्या २२ तारखेला होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तो पर्यंत हे प्रकरण चांगलेच तापणार आहे. परंतू सत्ताधारी व विरोधाकांच्या आर्थिक मतभेदांमुळे मात्र शहराचा विकास थांबला असल्याची चर्चा कालपासून शहरात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com