६५ वर्षाच्या आजीबाई बेडवरून झाल्या गायब ; आरोग्य प्रशासन हादरले

६५ वर्षाच्या आजीबाई बेडवरून झाल्या गायब ; आरोग्य प्रशासन हादरले

पोलिसांच्या मदतीने लावला शाेध

रावेर|प्रतिनिधी Raver

रुग्णांना बेड मिळवून देणे,ऑक्सिजन पुरवठा करणे,औषधोपचार करणे या सारख्या व्यवस्था करण्यात आरोग्य कर्मचार्यांची दमछाक होत असतांना अचानक ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेली ६५ वर्षीय महिला अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली.

येथील ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन वार्डात ४० पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहे.शनिवारी सकाळी तांद्लवाडी येथील पद्माबाई कडू ठाकूर अचानक काही एक न सांगता, याठिकाणाहून बेपत्ता झाल्या.

यामुळे आरोग्य यंत्रणा हादरून गेली.महिलेची शौचालय इतर परिसरात शोधाशोध केली मात्र महिला मिळून न आल्याने, त्यांच्या नातेवाईकांना माहित झाले. याने डॉक्टर्स व नातेवाईक यांच्यात वादहि झाला. याबाबत रावेर पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना माहिती मिळाल्यावर त्यांच्या अधिकाऱ्यांना महिलेच्या शोधाकामी रवाना केले असता .सदरील महिला दुपारी 2 वाजेच्या सुमारास स्टेशन रोडवरील जुन्या पुनखेडा रस्त्यावर एका केळीच्या बागेजवळ झाडाखाली बसलेली आढळून आली. सदरील महिलेला पोलिसांनी ताब्यात घेवून ऑक्सिजन सेंटरवर आणल्यावर रुग्णालय प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com