आंघोळीसाठी गेलेली बालिका वाहून गेली

चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथील घटना, दोघींना वाचविण्यात यश
आंघोळीसाठी गेलेली बालिका वाहून गेली

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील बहाळ येथे लग्ना घरी आलेल्या तीन मावस बहिणी नदीवर आंघोळीसाठी नदीवर गेल्या होत्या, त्यापैकी एका १३ वर्षीय बालिकेच्या पाण्याच्या प्रवाहात वाहतू जावून बुडून मृत्यू झाला आहे. तर दोन बालिकाना एक तरुणाने वाचविले, हि घटना आज संकाळ ९ वाजेच्या सुमारास घडली आहे, परंतू याप्रकरणी अद्याप पोलीस स्टेशनला कुठल्याही प्रकारची नोंद नाही, बुडालेला बालिकेच्या शोध घेण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे, पूनम उखा खैरनार(१३) रा.पाचोरा असे मयत बालिकेचे नाव आहे.

पूनम उखा खैरनार, खुशी सौदागार(७), मनीषा सौदागार(७) दोघे, रा.पाचोरा ह्या तिघी मावस बहिणी लग्नासाठी बहाळ येथे आई-वडिला सोबत आल्या होत्या. आज संकाळी त्या नदीवर आंघोळीसाठी गेल्या होत्या, त्यातील पूनम हिला पाण्याचा अंदाज न आल्याने, ती पाण्याचा प्रवाहात वाहत जावून तिचा बुडून मृत्यू झाला, तर खुशी व मनीषा या दोघींना गणेश भोई या तरुणाने पाण्यात उडी घेवून वाचले, पूनम हिचा मृतदेह अज्ञाप मिळुन आला नाही, पट्टीचे पोहणार बुडालेल्या पूनमचा शोध घेत आहेत. याप्रकरणी पोलीस पाटील यांनी पोलिसांना माहिती दिल्याचे सांगीतले जात आहे. परंतू आतापर्यंत मेहुणबारे पोलीसात कुठल्याही प्रकारची नोंद नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com