दहा वर्षीय बालिकेवर नराधमाने केला अत्याचार
जळगाव

दहा वर्षीय बालिकेवर नराधमाने केला अत्याचार

महाळपुर ता.पारोळा येथील घटना, आरोपी फरार

Rajendra Patil

पारोळा - प्रतिनिधी

तालुक्यातील महाळपुर येथे एका दहा वर्षीय बालिकेवर 50 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची समाजमन सुन्न करणारी घटना काल घडली.

वडील शेतात तर आई अमळनेर येथे दवाखान्यात गेली असताना त्यांची एक 14 वर्षीय मुलगी व एक दहा वर्षे वयाची मुलगी, मुलगा सात वर्ष असे घरी असताना गावातील महादू भिला थोरात याने दहा वर्षे मुलीला माझ्यासोबत चल असे म्हणून माझा हात पकडून मला गावाचे बाहेर भवानी मंदिराच्या जवळ घेऊन गेला व माझ्याशी वाईट कृत्य केले मी आरडाओरड केल्याने त्यावेळेस माझी आत्या शेतात जात असताना तिला माझा आवाज ऐकू आल्याने ती तेथे आली तेव्हा महादू पळून गेला.

आत्याने मुलीला घरी सोडून शेतात निघून गेली दुपारी ४:३० वा मुलगी घरी रडत असताना तिच्या आईने तिला विचारले त्यावेळी तिने घडलेली हकीकत सांगितली त्यानंतर रात्री मुलीला घेऊन आई-वडील पोलीस ठाण्यात आले पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात महादू भिला थोरात राहणार महाळपुर याविरुद्ध फिर्याद देऊन बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाचोरा पोलीस स्टेशन विजया वसावे हे करीत आहेत.

रात्री उशिरा मुलीची वैद्यकीय तपासणीसाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे, आरोपी महादु थोरात हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com